नवी दिल्ली – अनेक कंपन्या आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरातीच्या वेगवेगळ्या कृल्प्त्या शोधत असतात. संयुक्त अरब अमिरातमधील एका विमान वाहतूक कंपनीने अशीच एक जाहिरात चित्रीत केली आहे. या जाहिरातीची पूर्ण जगात चर्चा सुरू आहे. ही जाहिरात जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफावर चित्रीत केली आहे. एक महिला इमारतीच्या सर्वात वरच्या टोकावर पोस्टर घेऊन उभी असल्याचे दिसत आहे.
संयुक्त अरब अमिरातमधील हवाई वाहतूक कंपनी अमिरात एअरलाइनने हे चित्रीकरण केले आहे. बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर एअरलाइनचे क्रू मेंबरच्या पोषाखात एक महिला उभी आहे. ही महिला हातातील एक एक पोस्टर दाखवत आहे. या पोस्टरच्या माध्यमातून एअरलाइनने आपल्या ग्राहकांना संदेश दिला आहे. महिलेच्या हातात दिसणार्या पोस्टरवर लिहिले आहे, यूएईला यूके अॅम्बरच्या यादीत घेऊन गेल्याने आम्हाला जगातील सर्वात उच्च स्थानावर पोहोचल्याचा भास होत आहे. अमिरातमध्ये उड्डाण करा, चांगली उड्डाण करा. या जाहिरातीला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. पाहता पाहता ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. फक्त ३० सेकंदाच्या जाहिरातीत आश्चर्यकारक पराक्रम दाखविण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला निकोल स्मिथ एक व्यावसायिक स्कायडायव्हींग प्रशिक्षक आहे. निकोलने आपल्या इन्स्टाग्रामवर या जाहिरातीला शेअर करताना लिहिले आहे, की निसंशय मी केलेल्या या सर्वात आश्चर्यकारक आणि रोमांचकपैकी हा एक स्टंट आहे. क्रिएटिव्ह मार्केटिंग कल्पनेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. त्याशिवाय एअरलाइनच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडिओ कसा चित्रीत झाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ
https://twitter.com/emirates/status/1424657265181724676