इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेतील टेक्सास शहरात एका महिलेने एकाचवेळी दोन मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही मुले पाच दिवसांच्या फरकाने गर्भात दिसून आली. त्यामुळे त्यांना जुळे म्हटले जाणार नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत या अत्यंत दुर्मिळ अवस्थेला सुपरफेटेशन म्हणतात. आतापर्यंत जगभरात अशी केवळ डझनभर प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
अमेरिकेतील टेक्सास येथील २५ वर्षीय कारा विनहोल्डला पाच दिवसांत दोनदा गर्भधारणा झाली. काराच्या म्हणण्यानुसार, तिची चाचणी झाली आणि ती गर्भवती असल्याचे समजले. डॉक्टरांनी सांगितले की ती आधीच गरोदर आहे आणि पाच दिवसांपूर्वीच गर्भात पहिले मूल आले आहे. तसेच, डॉक्टरांनी सांगितले की दोन्ही मुले एकत्र जन्माला येतील, परंतु त्यांना जुळे म्हणता येणार नाही. म्हणजेच ही सुपरफेटेशनची घटना आहे
सुपरफेटेशन म्हणजे काय?
गर्भधारणा सुरू झाल्यानंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुसरे मूल आले तर त्याला सुपरफेटेशन म्हणतात. काही दिवस किंवा आठवडे नंतर गरोदर राहणे ही वेगळी गर्भधारणा मानली जाते. म्हणजेच त्या मुलांना जुळी म्हणता येणार नाही. साधारणपणे, गर्भधारणेनंतर, शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, स्त्रीच्या गर्भाशयातून प्रतिसाद मिळणे बंद होते. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. पण तसे झाले तर त्याला सुपरफेटेशन म्हणतात.
कारा म्हणाली की तिची दोन मुले, सेल्सन आणि सेदान अगदी सारखी दिसतात. अशा परिस्थितीत लोक अनेकदा विचारतात की दोघे जुळे आहेत का? पण आम्ही त्यांना जुळे म्हणत नाही. दरम्यान या प्रकरणाची टेक्सास शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकावेळी जन्माला येऊनही जुळे का म्हणले जात नाही याविषयी अनेकांना प्रश्न आहे.