सोमवार, सप्टेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतीचा कुठलाही अनुभव नाही… बैलगाडीने शेतमालाची विक्री… आता १० एकरवर भाजीपाल्याची लागवड… मानूरच्या मुक्ताबाईंची यशोगाथा

by Gautam Sancheti
सप्टेंबर 30, 2022 | 11:28 am
in स्थानिक बातम्या
0
PBT3293

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्यक्ष शेतीकामाचा कुठलाही अनुभव नसताना कुटुंब चालविण्यासाठी मुक्ताबाईंनी शेतीचा मार्ग निवडला. शेतीकाम करण्यापासून ते बैलगाडीने शेतमालाची विक्री करून कुटुंब उभारणी करणाऱ्या मुक्ताबाईंची ही कथा…

मानूर येथील माहेर असलेल्या मुक्ताबाईंचा १९७८ मध्ये एकलहरे येथील रामदास डुकरे-पाटील यांच्याशी विवाह झाला. पती रामदास हे त्या वेळी महावितरण मध्ये चतुर्थश्रेणी कामगार म्हणून नोकरीस होते. त्यांच्या अल्प पगारातून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबखर्च भागणेही मुश्‍किल होते. घरी शेती होती पण नोकरीमुळे घरच्या शेतीत त्यांना जास्त वेळ देणे शक्य नव्हते. त्यावेळी मुक्ताबाईंनी शेतीसाठी पुढाकार घ्यायचे ठरवले. माहेरी प्रत्यक्ष शेती कामाचा कोणताही अनुभव त्यांना नव्हता. अनुभव नसल्याने पती रामदास यांच्याकडून त्या कामे शिकत गेल्या. सुरूवातीला दुध व्यवसायाचे काम जास्त होते. त्यामुळे मुक्ताबाईंनी आधी शेळीचे दूध नंतर गायीचे व पुढे म्हशीचे दूध काढण्याचे प्रशिक्षण घेतले.

त्यावेळी त्यांची साडेसात एकर एकर जमीन होती. त्यात गहू, हरभरे कांदे ही सर्व पिकं घेतली जात. हळूहळू मुक्ताबाई सर्व कामं शिकत गेल्या. पती कामावर गेल्यानंतर शेतीची सर्व जबाबदारी मुक्ताबाई सांभाळून घेत. पिकाची काढणी झाल्यानंतर पती रामदास क्रेट भरून सायकलवर विक्रीसाठी घेऊन जात. उद्या शेतात काय करायचं याचं नियोजन त्या रात्रीच रामदास यांच्यासोबत करून घेत. त्यावेळी शेतीतील जास्त उपकरणे नसल्याने बरीचशी कामे स्वतः हाताने करावी लागत. नंतर शेताला पाण्यासाठी विहीरीचे काम सुरू केले. त्यावेळी मजुरांची कमतरता असल्याने मुक्ताबाई स्वतः मजुरासोबत कामं करत.

त्यावेळी घर आणि शेतमळा यांच्यातील अंतर जास्त असल्याने खूप गैरसोय होत होती. त्यामुळे विहीरीचे काम सुरू असतांना त्यातून निघालेल्या दगडांचा वापर करुन त्यांनी मळ्यात घर बांधण्याचा निर्णय घेतला. प्रसंगी स्वतः या घरासाठी दगडं फोडून घराचे बांधकाम केले. घरासाठी एकदा वाळू कमी पडत असताना त्या गर्भवती असताना सातव्या महिन्यात त्यांनी नदीवरून वाळू वाहून आणली. हे प्रसंगच त्यांना जास्त बळकटी देत होते.

हळूहळू शेतीतील नवनवीन प्रयोगांचा विचार त्या करू लागल्या. मुक्ताबाईंच्या माहेरी द्राक्षशेती केली जात. ते पाहून आपल्या शेतीतही त्यांनी द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला उत्पन्न कमी पडत असल्याने मुक्ताबाई आजूबाजूच्या शेतावर रोजाने काम करायला जात. त्यातून थोडी आर्थिक मदत तर व्हायची पण द्राक्षशेतीतील त्यांचा अनुभव वाढत गेला. हे सगळं करत असताना घर आणि शेती या दोन्ही जबाबदार्या मेहनतीने त्या सांभाळत होत्या.

सोबत तीन मुलं असून त्यांचेदेखील शिक्षण चालू होते. शेती करत असताना शेतमालाच्या विक्रीचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. घरात एक बैलगाडी होती. तिच्या सहाय्याने त्या शेतमाल विक्रीसाठी बाहेर पडू लागल्या. लहान मुलाला घेऊन या बैलगाडीतून त्या मालाची वाहतूक करत. एकदा पाऊस जास्त झाल्याने वाटेल चिखलात गाडीचे चाक फसले. तसेच पाण्यातून गाडी जात असल्याने बैल पाण्यावर तरंगू लागले. त्यावेळी आपली हिम्मत न हारता त्यांनी त्या प्रसंगावर मात केली. असे अनेक कठीण प्रसंग या प्रवासात आले होते ज्याच्यावर त्यांनी जिद्दीने लढा दिला.

पुढे शेतीतून चांगले उत्पन्न येत गेले. शेतीत जेव्हा उत्पन्न येत होते तेव्हा मुक्ताबाई त्याचे सोनं घेऊन गुंतवणूक करत. वेळप्रसंगी भांडवलाची गरज पडल्यास त्याचा उपयोग होत. साडेसात एकरवरून आज १० एकरवर जमीन वाढवली आहे. मुलांना मोठे करून उच्चशिक्षित करण्याचे मुक्ताबाईंचे स्वप्न होते. आज मोठा मुलगा डॉक्टर असून लहान मुलगा शेतीची जबाबदारी सांभाळत आहे तसेच मुलगी महावितरण मध्ये नोकरीस आहे. आज शेतीत द्राक्षांची निर्यात केली जात आहे. द्राक्षासोबत टोमॅटो, भात, भाजीपाल्यात काम चालू आहे. मुक्ताईच्या जिद्दीची ही कथा इथेच थांबत नाही. आयुष्यभर नीट निगुतीने केलेला संसार आणि कष्टाने केलेल्या शेतीमुळे चित्र पालटले आहे. परिस्थिती कितीही बिकट असो आपल्याला ठामपणे उभे राहता आले पाहिजे. हिंमत, चिकाटी आणि सातत्य असेल तर दिवस बदलल्याशिवाय राहत नाही हाच संदेश मुक्ताताईंची ही कथा देते. या नवदुर्गेला सलाम!

Women Farmer 10 Acre Muktabai Success Story

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सरकारने काढले आदेश (बघा संपूर्ण यादी)

Next Post

हृदयनाथ मंगेशकर यांच्या धन्यवाद ट्विटचे पंतप्रधानांनी असे मानले आभार….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Sushma Andhare
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 31, 2025
ycmou gate 6
स्थानिक बातम्या

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 31, 2025
Untitled 50
मुख्य बातमी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा…झाले हे निर्णय

ऑगस्ट 31, 2025
WhatsApp Image 2025 08 31 at 1.51.19 PM 1024x683 1
संमिश्र वार्ता

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शन

ऑगस्ट 31, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

ऑगस्ट 31, 2025
Next Post
Fd02v1nWIAA98ri e1664517071790

हृदयनाथ मंगेशकर यांच्या धन्यवाद ट्विटचे पंतप्रधानांनी असे मानले आभार....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011