भोपाळ – स्त्री शक्ती नेमकी काय आहे आणि महिला काय करु शकतात याचे एक ज्वलंत उदाहरण पुन्हा समोर आले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा बाऊ केला जात असला तरी महिला आपल्या कर्तव्याला किती महत्त्व देतात हे मध्य प्रदेश पोलिस दलातील महिला पोलिस अधिकाऱ्यामुळे अधोरेखित होत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे अलीराजपूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एक महिला अधिकारी तिच्या पोटाला आपल्या मुलीला बांधून कर्तव्य बजावत होती. ही महिला अधिकारी डीएसपी मोनिका सिंह आहे. आपल्या दीड वर्षांच्या मुलीला उराशी बांधून ती मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सक्रीय असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनाही जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी सिंह यांची भेट घेतली. त्यांची व तिच्या कन्येची मायेने विचारपूस केली. कॅरिअर बॅगमध्ये मुलीला घेऊन ड्युटी करणे तसे जिकरीचे आहे. पण, मध्य प्रदेशच्या मुली या अशा साहसी आहेत. मोनिका यांचा कर्तव्यभाव हा अभिनंदनीय आहे. संपूर्ण मध्यप्रदेशला तुमच्यावर गर्व आहे. मोनिका यांना मी खुप खुप आशिर्वाद देतो, असे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. तसेच, या घटनेमुळे संपूर्ण देशभरात मोनिका यांच्या कर्तव्य आणि जबाबदारीचे कौतुक होत आहे.
अलीराजपुर यात्रा के दौरान मैंने देखा कि डीएसपी मोनिका सिंह अपनी डेढ़ वर्ष की बेटी को बेबी कैरियर बैग में लिए ड्यूटी पर तैनात थीं।
अपने कर्तव्य के प्रति उनका यह समर्पण अभिनंदनीय है। मध्यप्रदेश को आप पर गर्व है।
मैं उन्हें अपनी शुभकामनाएं और लाडली बिटिया को आशीर्वाद देता हूं। pic.twitter.com/XFk7h2yxyY
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) October 20, 2021