नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी महिला आता वाहने चालविताना दिसत आहेत. कॅबचालक म्हणूनही महिला काम करत आहेत. सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी कुचंबना, गैरसोय पाहता आता अशा सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
Women Driver Parking Big Announcement
Reservation Public Places