नवी दिल्ली – या जगात सामान्य पद्धतीने आपले जीवन जगणारी माणसे आहेत, त्याचप्रमाणे काहीतरी अद्भुत आगळेवेगळे किंबहुना विचित्र काम करून किंवा वर्तन करून आपले लक्ष वेधून घेणारी स्त्री पुरुष देखील आहेत. त्यामुळे या जगात आजच्या काळात कोण काय करेल ? याचा काही नेम नाही. आपण विचार देखील करू शकणार नाही. असे काम ही मंडळी करतात.
क्रोएशियामध्ये असेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न केले आहे. आता यात नवल ते काय ? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटस्फोटानंतर महिलेने तिचे लग्न कोण्या पुरुषाशी नाही तर कुत्र्याशी केले आहे. विशेष म्हणजे हा विचित्र विवाह थाटामाटात पार पडला आणि या लग्नात जवळपास २०० जण सहभागी झाले होते.
अमांडा रॉजर्स या ४७ वर्षीय महिलेने तिच्या मादी कुत्र्याशी लग्न करून खूप आनंदी असल्याचे तिने सांगितले. तसेच ती म्हणाली की, मला जीवनसाथीमध्ये जे काही हवे आहे, ते शीबामध्ये म्हणजे या मादी कुत्रामध्ये मिळाले आहे. तसेच घटस्फोटानंतर अमांडा रॉजर्स अनेक महिने अविवाहित राहिली. आता ती तिची नवीन जोडीदार शीबासोबत खूप खूश आहे.
अमांडा रॉजर्सने स्पष्ट केले की, शीबा तिला तिच्या पहिल्या पतीपेक्षा अधिक आनंदी करते. आपल्या कुत्र्याशी पूर्ण रीतीरिवाजाने लग्न केले आणि त्याचे चुंबन घेतले आणि आपला साथीदार मानले. अमांडाने सांगितले की, ती माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. ती मला हसवते, मला आनंदी ठेवते आणि मी नाराज असताना मला प्रेम देते.
अमांडा म्हणते की, तिला लहानपणापासूनच स्वत:ला वधूच्या ड्रेसमध्ये पाहायचे होते. दुसऱ्यांदा तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वतः वधूचा ड्रेस डिझाइन केला. शेबा मला कधीही त्रास देत नाही, माझी खूप काळजी घेते. ती दोन महिन्यांची असताना तिच्या कुत्र्याच्या प्रेमात पडली होती.