विशेष प्रतिनिधी, मुंबई
आपल्या मुलांवर प्रत्येक आईचे निस्वार्थ आणि अमर्याद प्रेम असते. दु: ख, वेदना आणि आजारपणातसुद्धा ती आपल्या मुलांसाठी स्वंयपाक बनविणे किंवा जेवण तयार करणे विसरत नाही, परंतु इंटरनेटवर आलेल्या एका फोटोत आपल्या आईचे मुलांवरील असे प्रेम पाहून अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण ऑक्सीजनवर असतानाही एका महिलेने स्वयंपाक केला असून तिचा फोटो व्हायरल होत आहे.
सध्या कोरोनाबाधित अनेक रुग्ण हे रुग्णालयात जाऊन उपचार घेत असताना, व्हायरल फोटोत एक महिला ऑक्सिजनच्या आधारावर असूनही स्वयंपाकघरात पोळया बनवताना दिसत आहे. तसेच त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘आईचे निस्वार्थ प्रेम ‘ … सदर फोटो पाहून एका नेट वापरकर्त्यांचा राग भडकला आणि तो म्हणाला की, आईला कधीही सुटी देण्यात येत नाही.
तसेच प्रसिद्ध गायक चिन्मय श्रीपाद यांनीही फोटोवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, यामुळे महिलांना विश्रांती घेण्यासाठी काय करता येईल का ? आणि निःस्वार्थ प्रेमाची प्रक्रिया थांबवता येईल का? तर तमिळ चित्रपट निर्माते मोहम्मद अली म्हणाले की, हे प्रेम नाही, तर ती सामाजिक रचनेच्या नावाखाली गुलामगिरी आहे. त्याचप्रमाणे, काही वापरकर्त्यांनी या फोटोच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि त्यास बनावट म्हटले.