इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुत्र्याला मारले म्हणून एक महिलेने सिक्युरिटी गार्डला काठीने मारल्याचे त्यात दिसून येत आहे. व्हिडिओ मध्ये तसे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नोएडाच्या एका रिक्षा चालकाला महिलेनं चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा सिक्युरिटीला एका महिलेचा मार खावा लागला आहे. हा व्हिडिओ आग्रा शहरातील असल्याचे समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबी ड्रेसमधली एक महिला सिक्युरिटी गार्डला मारहाण करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिक्युरिटी गार्ड आणि या महिलेच कुत्र्यावरून वाद झाला. महिलेला राग अनावर झाल्यानं तिनं सिक्युरिटी गार्डला आधी शिव्या दिल्या. सिक्युरिटी गार्डनं उलट उत्तर दिल्यानंतर महिलेला जास्तच राग आला अन मग तिनं त्याला चोपचोप चोपलं. या व्हिडिओमध्ये या महिलेसोबत इतरही काही महिला दिसत आहेत. आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला.
सिक्युरिटी गार्डनं मला काठीनं मारल्याचं सांगत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या मर्यादा ओलांडून एखाद्याशी वागणं चुकीचं असल्याची कमेंट एका युजरनं केली आहे. तुम्हाला मारण्याचा काहीही अधिकार नाही अशा शब्दात या महिलेची कानउघडणी एका नेटिझन्सनी केली आहे.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/madanjournalist/status/1558746514842759169?s=20&t=Rv1gQcLM4-ML0gL7BNZKwA
Women Beaten Security Guard Video Viral
Dog Crime Social Viral