नवी दिल्ली – भारतीय कौटुंबिक पद्धतीत साधारणत : सुनेला सासू कडून खूप त्रास दिला जातो, विवाहित महिलेला सासरवास केल्या जातो, तिला मारहाण केली जाते, असे सर्वत्र आढळून येते. परंतु हरियाणामध्ये मात्र याच्या उलट घटना घडली. येथे एका सुनेच आपल्या सासूला मारहाण केल्याची घटना घडली.
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका सूनेने तिच्या सासूला मारहाण आणि अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सून घरगुती वादामुळे आपल्या वृद्ध सासूला मारहाण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ वृद्ध महिलेच्या मुलाने म्हणजेच सूनेच्या पतीने केला आहे.
तसेच आपल्या फोनवरून व्हिडिओ बनवल्यानंतर त्या तरुणाने राजेंद्र पार्क पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे याबाबत तक्रार केली असून त्यात तरुणाने आपल्या पत्नीवर तिच्या आईवर हल्ला केल्याचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. सदर तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आयुष मित्तल यांनी सांगितले की, घरगुती वादामुळे पत्नी कविताने आईला मारहाण केली. त्याने सांगितले की, यापूर्वी देखील काही मुद्द्यावरून घरगुती वादात त्याच्या पत्नीने त्याची आई अंशु मित्तलला मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
सदर व्हिडिओमध्ये सून आपल्या सासूशी भांडताना आणि मारहाण करताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या महिलेचे कुटुंबीय सांगतात की सून नेहमी भांडत असे. त्याच्याविरोधात तक्रारही करण्यात आली होती, परंतु आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही.