सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालूक्यातील अंगुलगाव येथे कळपातील दोन काळविटांची झुंज चांगलीच रंगली. बराच वेळ ही झुंज सुरु असल्यामुळे परिसरातील काही शेतक-यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी वनविभागाच्या कर्मचा-यांना या झुंजीची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी तातडीने या ठिकाणी आले. या झुंजीत थकलेला एक काळविट जागीच पडलेला होता. वनकर्मचा-यांनी मोठ्या बांबूच्या सहाय्याने काळविटाला हलवल्यानंतर काळविटांने डोंगरावर धाव घेतली. येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या हरिण संवर्धन क्षेत्रात मोठ्या संख्येने हरिण, काळविटांची संख्या आहे. त्यांचे मोठे कळप या ठिकाणी पहावयास मिळतात. आज झुंज येथील स्थानिकांनी बघितली…