मुंबई – बहुतांश आर्थिक व्यवहार आता ऑनलाइन झाले आहेत. ऑनलाइन पेमेंट UPI द्वारे केले जाते. त्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. परंतु तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसलेल्या ठिकाणी गेल्यास UPI संलग्न असणार्या कोणत्याही अॅपमधून आर्थिक व्यवहार करणे अशक्य ठरते. अशी एक ट्रिक आहे जिचा वापर करून विनाइंटरनेट UPI चा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त फोनच्या डायलरवर *99# या यूएसएसडी कोडचा वापर करावा लागेल.
ही *99# सेवा भारतात स्मार्टफोन न वापरणार्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आली आहे. तुम्ही वापरत असलेला फोन नंबर तुमच्या UPI खात्याशी जोडला गेला असेल तोपर्यंत तुम्ही *99# सेवेचा वापर करू शकतात. तसेच UPI सुविधालांचा लाभ घेऊ शकतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी *99# ही आपत्कालीन सुविधा असून, इंटरनेट कनेक्शन नसल्यास तिचा वापर तुम्ही करू शकतात.
विनाइंटरनेट कसा वापर करावा यासाठी खालील बाबी ध्यानात घ्या
१) तुमच्या फोनवर डायलर उघडून *99# टाइप करा आणि कॉल बटन दाबा
२) पैसे पाठविण्यापूर्वी एकासह अनेक पर्याय पाहावेत. १ वर टॅप करून सेंडवर टॅप करा, पैसे पाठविण्याचा पर्याय निवडा.
३) पैसे मिळालेल्या व्यक्तीकडून तुमच्याजवळील माहिती निवडा. ज्याला पाठवायचे आहे त्याचा नंबर टाइप करून पुन्हा पाठवण्याच्या पर्यायावर टॅप करा.
४) यूपीआय खात्याशी संलग्न मोबाई नंबर नोंदवा आणि पाठवा या पर्यायावर टॅप करा. योग्य नंबर नोंदविल्याची खात्री करा.
५) जितकी रक्कम तुम्हाला पाठवायची आहे ती नोंदवा आणि पुन्हा पाठवा.
६) पॉप अपमध्ये पैसे पाठविण्यासाठी एक टिप्पणी नोंदवा. हे पैसे कोणाला आणि कशासाठी पाठवत आहात हे कळू शकते. उदाहरणार्थ- किरणा दुकान