अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्हाला व्यवसाय किंवा लघु उद्योग करायचा असेल आणि त्यासाठी कर्ज हवे असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे वृत्त आहे. तुम्हाला १ लाख रुपयांचे कर्ज ते सुद्धा बिनव्याजी मिळू शकते. यासाठीची प्रक्रिया आणि अन्य बाबी आपण आता जाणून घेणार आहोत….
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, यांच्या अहमदनगर जिल्हा कार्यालयाला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असुन व्याज परतावा कर्ज योजना, १० लाखापर्यंत ११९ प्रकरणे, बीज भांडवल कर्ज ४७ प्रकरणे, बचतगटासाठी गटकर्ज व्याज परतावा योजना (१० ते ५० लाख) १३ प्रकरणे, शैक्षणिक व्याज परतावा कर्ज योजना ११ प्रकरणे एवढे उदिष्ट उपलब्ध झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या www.msobcfdc.org या वेबपोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
यासोबतच महामंडळाकडून १ लाखाच्या थेट कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी ओबीसी प्रवर्गातील १३५ बेरोजगार तरुणांना लघुउद्योगासाठी कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी अर्जदाराचा सीबील क्रेडिट स्कोअर ५०० असणे बंधनकारक आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक (मोबाईल क्रमांक ९७६७५८५९६४) जिल्हा कार्यालय, सारसनगर, साई सोना अपार्टमेंट जवळ, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
Without Interest Loan 1 Lakh Rupees Procedure and details