मुंबई – देशातील आघाडीची वाहन उत्पादक म्हणून प्रसिद्ध असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नुकतीच आपली नवीन SUV महिंद्रा XUV700 ही कार लाँच केली. विशेष म्हणजे या एसयूव्ही लाँचची बुकिंग काल दि. 7 ऑक्टोबरला सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा 57 मिनिटांत, कंपनीने 25 हजार युनिट्ससाठी बुकिंग नोंदणी केली आहे. मात्र आता त्यानंतर कंपनीने या कारची किंमत वाढविली आहे.
नवीन XUV700 ची पहिली 25 हजार युनिट्स प्रास्तावित किंमतीसह बुक केली गेली. मात्र त्यानंतरच्या सर्व नवीन युनिट्ससाठी कंपनीने किंमत वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. आता त्याची ऑनलाईन बुकिंग आजपासून म्हणजेच दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली असून त्याकरिता नवीन किंमती लागू केल्या जातील.
किंमत वाढली
आधी 11.99 लाख रुपये होती. परंतु आता MX पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 12.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. या व्हेरिएंटची किंमत सुमारे 50 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे, त्याचबरोबर डिझेल प्रकारांची किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते. येथे सर्व प्रकारांच्या नवीन किंमती खाली आहेत.
अशी आहेत वैशिष्ट्ये
कंपनीने ही एसयूव्ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. त्याच्या पेट्रोल प्रकारात 2.0 लिटर क्षमतेचे Amstoline टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. तर दुसरीकडे, 2.2 लिटर क्षमतेचे mHawk टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन डिझेल प्रकारात वापरले गेले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन गिअरबॉक्समध्ये येते. दुसरीकडे, AX व्हेरिएंटचे इंजिन 185hp पॉवर आणि 420Nm टॉर्क जनरेट करते.
लक्झरी पॅक
कंपनी या SUV च्या लक्झरी पॅक व्हेरियंटमध्ये आकर्षक फिचर्स देत आहे. यामध्ये प्रगत चालक सहाय्य प्रणाली आहे. तसेच ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, इन्फोटेनमेंट सिस्टम, सोनीची 3D सराउंड साउंड सिस्टम, 360-डिग्री कॅमेरे, इलेक्ट्रिकली डोअर हँडल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, वायरलेस फोन चार्जर आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांचा समावेश आहे.