मुंबई – सध्या बाजारात विविध प्रकारचे स्मार्टफोन आले आहेत. परंतु काही फोनची विशेष क्रेझ असून त्यांची प्रचंड मागणी आहे. त्यातच एका फोनने तर कमालच केली आहे. या फोनची विक्रमी विक्री झाली असून तो ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. मोटोरोलाच लेटेस्ट स्मार्टफोन Moto Edge X30 ला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चीनमधील पहिल्या सेलमध्ये या फोनचे 10 हजार युनिट्स तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत विकले गेले.
1) याबाबत कंपनीने एक पोस्ट शेअर करून सांगितले की, या फोनच्या पहिल्या सेलमध्ये 100 मिलियन युआन म्हणजेच सुमारे 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेत विकले गेले. चीनमध्ये हा फोन अनेक ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. फोनची सुरुवातीची किंमत 3199 युआन म्हणजेच सुमारे 38,300 रुपये आहे.
2) Moto Edge X30 ची वैशिष्ट्ये आणि तपशील : सदर कंपनीच्या या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशो आणि 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येत असलेला, फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरद्वारे उपलब्ध आहे.
3) साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज हा फोन फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात देतो. यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 60 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
4) या फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 68 वॉट टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS साठी हा फोन MYUI 3.0 वर आधारित Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS/A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.