मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) : सॅमसंगच्या लेटेस्ट Galaxy S22 सिरीज स्मार्टफोनची भारतीयांमध्ये क्रेझ वाढत आहे. या मालिकेने भारतात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे यावरून तिची लोकप्रियता लक्षात येते. सॅमसंग कंपनीच्या या स्मार्टफोनची 12 तासांपेक्षा कमी कालावधीत 70 हजार पेक्षा जास्त प्री-बुकिंग केले गेले आहे. विशेष म्हणजे भारतात Galaxy S22 मालिकेसाठी 23 फेब्रुवारीपासून प्री-बुकिंग सुरू झाली आहे. सॅमसंग इंडिया कंपनीचे वरिष्ठ संचालक व उत्पादन विपणन प्रमुख आदित्य बब्बर म्हणाले की, नवीन Galaxy S22 मालिकेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत. Galaxy S22 मालिकेच्या प्री-ऑर्डर अत्यंत उत्साहवर्धक आहेत, आमच्या ग्राहकांना हे डिव्हाइस ऑफर करण्यास व ते लवकरात लवकर पुरविण्यास आम्ही वचनबद्ध आहे.
Galaxy S22 Ultra प्री-बुकिंग करणार्या ग्राहकांना Galaxy Watch4 smartwatch Rs.26,999 ची किंमत फक्त Rs.2999 मध्ये मिळेल. Galaxy Watch4 मालिका शक्तिशाली आरोग्य आणि निरोगीपणा ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह देण्यात येते, तसेच वापरकर्त्यांना शरीर रचना, झोपेचे स्वरूप, रक्त-ऑक्सिजन पातळी आणि नाडी ट्रॅक करण्यास उपयुक्त ठरते. Galaxy S22+ आणि Galaxy S22 चे प्री-बुकिंग करणार्या ग्राहकांना 11999 रुपये किमतीचा Galaxy Buds 2 फक्त 999 रुपयांमध्ये मिळेल. Galaxy Buds 2 इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवासाठी प्रीमियम ध्वनी गुणवत्ता प्रदान करते आणि सभोवतालच्या आवाजाला रोखते. याशिवाय, Galaxy S आणि Galaxy Note मालिकेतील ग्राहकांना रु. 8000 चा अपग्रेड बोनस मिळेल तर इतर डिव्हाइस धारकांना रु. 5000 चा अपग्रेड बोनस मिळेल. तसेच ग्राहक सॅमसंग फायनान्स प्लसद्वारे ही उपकरणे खरेदी करण्याचा पर्याय निवडतात त्यांना रु. 5000 चा कॅशबॅक मिळू शकतो.
भारतातील ग्राहक त्यांचे Galaxy S22 Ultra, Galaxy S22 प्लस आणि Galaxy S22 23 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत आघाडीच्या रिटेल आउटलेट्स, सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि Amazon वर प्री-बुक करू शकतात. Galaxy S22 मालिकेची विक्री 11 मार्च 2022 पासून सुरू होईल. Samsung ने भारतात आपले तीन स्मार्ट स्मार्टफोन Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra लाँच केले. सॅमसंगने गेल्या आठवड्यात Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमध्ये Galaxy S22 मालिका जागतिक स्तरावर सादर केली. गेल्या वर्षी आलेल्या Galaxy S21 मॉडेलच्या या अपग्रेड केलेल्या आवृत्त्या आहेत. Galaxy S22 Ultra, श्रेणीतील सर्वात प्रीमियम मॉडेल असल्याने, Galaxy S मालिकेला Galaxy Note सारखा अनुभव देण्यासाठी एकात्मिक S-Pen सपोर्ट आणतो.
Samsung Galaxy S22 and S22+ review pic.twitter.com/hokv1QySE0
— Engadget (@engadget) February 23, 2022
विविध स्मार्टफोन्सची किंमत अशी:
1. Galaxy S22 (8GB+128GB) किंमत: ₹72,999; रंग: फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट, हिरवा.
2. Galaxy S22 (8GB+256GB) किंमत: ₹76,999; रंग: फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट, हिरवा.
3. Galaxy S22+ (8GB+128GB) किंमत: ₹84,999; रंग: फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट, हिरवा.
4. Galaxy S22+ (8GB+256GB) किंमत: ₹88,999; रंग: फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट, हिरवा.
5. Galaxy S22 Ultra (12GB+256GB) किंमत: ₹1,09,999; रंग: बरगंडी, फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट.
6. Galaxy S22 Ultra (12GB+512GB) किंमत: ₹1,18,999; रंग: बरगंडी, फॅंटम ब्लॅक