मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर ओरखडे येणे, ओठ फाटणे अशा गोष्टींचा त्रास डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत होत असतो. संशोधनामधून निदर्शनास येते की, सर्व आजारांपैकी १.७ टक्के प्रमाण त्वचेच्या आजारांचे आहे. त्वचेच्या आजारामुळे पुरळ, जळजळ, खाज सुटणे इ.चा त्रास होऊ शकतो. या त्वचेच्या आजारांचे निराकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोरायसिस, त्वचारोग, एक्जिमा, पुरळ आणि त्वचेची अॅलर्जी यांसारख्या त्वचेच्या समस्या रुग्णाच्या चिंतेत वाढ करू शकतात. डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांनी हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे.
नैसर्गिक पद्धतीने त्वचेच्या आजारांचा सामना:
त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, पण नैसर्गिक उपचार अत्यंत गुणकारी ठरू शकतो. हायड्रेटेड राहण्याची नेहमीच शिफारस केली जाते. ह्युमिडीफायर त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध करण्यामध्ये मदत करू शकते. त्वचा हायड्रेटेड ठेवण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक म्हणजे उत्तम दर्जाचे मॉइश्चरायझर. हिवाळ्याच्या समस्या सहन करण्यासाठी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारात ओमेगा-३-फॅटी अॅसिड, कोल्ड वॉटर फिश आणि फ्लेक्ससीड्स असलेले पदार्थ त्वचा फाटण्यापासून प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. घरगुती उपचारांसह त्वचा कोरडी पडण्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, पण त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
होमिओपॅथी उपचार पद्धती
होमिआपॅथीला इतर समकालीन उपचारांपेक्षा वेगळी करणारी बाब म्हणजे ते नैसर्गिक, सुरक्षित व किफायतशीर असण्यासोबत त्याचे कोणतेही प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही. ते सामान्यत: त्वचेच्या आजारांनी पीडित रूग्णांमध्ये आढळून येणारे मानसिक तणाव व नैराश्य या स्थितीवर उपचार देखील करते.
तर मग, यंदा हिवाळ्यामध्ये त्वचेच्या नुकसानासाठी कोणतेही कारण असो होमिओपॅथीमध्ये सर्व गंभीर त्वचेविषयक आजारांसाठी उपाय आहे. डॉ. बत्रा’ज डर्मा हील हे स्किनकेअरमधील क्रांतिकारी उत्पादन आहे. ही उपचारात्मक हलकी स्किन थेरपी आहे. ही थेरपी त्वचेवर होणारी खाज कमी करू शकते, त्वचेमधील लालसरपणा व त्वचेचे घाव बरे करू शकते.
हिवाळ्यात केसांसाठी उपयुक्त होमिओपॅथी औषधे:
होमिओपॅथी औषधे वनस्पती-आधारित घटकांपासून बनवली जातात, ज्यामुळे ही औषधे कोणत्याही अॅडव्हर्स ड्रग रिअॅक्शन्स (एडीआर) शिवाय सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्वचेच्या काळजीसाठी काही निर्धारित औषधे आणि उत्पादने पुढीलप्रमाणे:
ग्रॅफाइट्स: एक्जिमाचा परिणाम न होणारा त्वचेचा काही भाग सतत कोरडा पडणे, हातपाय, कंबर, मान व कानांची मागील बाजू खडबडीत होणे, रक्तस्त्राव, भेगा व वेदनादायक स्तनाग्र आणि केलॉइड व फायब्रोमाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर (डॉक्टरांच्या देखरेखीखाली) उपचार करण्यासाठी डॉक्टर या होमिओपॅथिक औषधाची शिफारस करतात.
पेट्रोलियम जेली: डॉक्टर्स हात व पायांवरील भेगां व फिशर्ससाठी या होमिओपॅथी औषधाची शिफारस करतात.
डॉ. बत्रा’ज इंटेन्स मॉइश्चरायझिंग क्रीम: डॉक्टर्स अॅलोवेरा (कोरफड) व एकिनेशियाने संपन्न या होमिओपॅथिक औषधाची (दिवसातून दोनदा) शिफारस करतात.
Winter Skin Care Homeopathy Expert Guide