नागपूर – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आरोग्य विषयी अनेक उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे. विशेषत : आयुर्वेदात आहार आणि आरोग्य या संदर्भात अत्यंत मोलाची मार्गदर्शन करण्यात आले आहे. दैनंदिन आहारात कोणत्या फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा समावेश करावा, याची देखील माहिती यात आहे. आपण रोज पालेभाज्या फळभाज्या खाण्यावर भर देतो, परंतु त्याच सोबत गाजर, कांदा, मुळा, बीट, लसूण यासारख्या जमिनीत येणाऱ्या भाज्यांचा देखील आहारात समावेश करणे आवश्यक आहे. मुळा हे मूळ वर्गीय फळ किंवा भाजी असून याबद्दल माहिती जाणून घेऊ या..
मुळा हा आहारात कधी पराठे तर कधी सॅलड आणि लोणचे बनवण्यासाठी वापरतात. मुळा केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही उपयोगी आहे. याच्या नियमित वापराने शारीरिक फायदा तर होतोच पण सौंदर्य वाढवण्यासही मदत होते. मुळा व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, फायबर, साखर यांनी समृद्ध आहे. जे व्यक्तीचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.
साखर नियंत्रणात
मुळामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्याच्या पानांमध्ये असल्या पोषकतत्वांमध्ये बॅक्टेरियाच्या अँटी-बॅक्टेरिअल गुणांची मुबलक मात्रा असते, ती शरीराला डिटॉक्सीफाय करण्यात मदत करतात.
पोटासाठी फायदेशीर
मुळा हा फायबरने समृद्ध आहे जे पचनसंस्था मजबूत करून पोटाशी संबंधित बहुतेक आजार दूर ठेवण्यास मदत करते. रोज मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने व्यक्तीला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
रोगप्रतिकारक शक्ती
मुळा मध्ये अनेक अँटिऑक्सिडंट आणि अँथोसायनिन गुणधर्म असतात जे एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात. मुळा मध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी6, पोटॅशियमसह इतर अनेक पोषक घटक देखील असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
त्वचेच्या समस्या
मुळामधील फॉस्फरस आणि झिंक हिवाळ्यात कोरड्या त्वचेचे पोषण करून मुरुम, चेहऱ्यावर पुरळ, ऍलर्जी यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
हायड्रेट
मुळा खाल्ल्याने माणसाला डिहायड्रेशनची समस्या होत नाही आणि शरीर नैसर्गिकरित्या हायड्रेट होत राहते.
रक्तदाब
शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे योग्य संतुलन राखण्यासाठी मुळा खूप उपयुक्त आहे. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.