माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मुंबई कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात सरासरीपेक्षा २-३ डिग्रीने घसरण होवून थंडी जाणवत आहे. पुढील ३ दिवसात म्हणजे सोमवार दि.१६ ते बुधवार दि.१८ जानेवारी पर्यन्त किमान तापमानात अधिक घसरण होवून अधिक थंडी महाराष्ट्रात जाणवेल, असे वाटते. म्हणजेच कडाक्याच्या थंडीला आपल्या सर्वांना सामोरे जायचे आहे.
विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्र व सभोवतालच्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात तसेच अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात उद्या दि. १६ जानेवारीपासून पुढील ३ दिवस म्हणजे बुधवार १८ जानेवारीपर्यंत काहीशी थंडीची लाटसदृश्य स्थिती जाणवेल.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1614637498084491264?s=20&t=dm6tRfD4sP5XYEI8ZfeVgQ
१६ ते १८ जानेवारी दरम्यान निरभ्र आकाश व सरासरी इतक्या जाणवणाऱ्या कमाल तापमानामुळे रात्रीची जाणवणाऱ्या थंडीबरोबरच दुपारच्या तापमानामुळे ऊबदारपणा जाणवेल व दिवसा थंडी सुसह्य होईल. सध्या पास होत असलेल्या पश्चिमी झंजावाताबरोबरच बुधवार दि. १८ जानेवारीपासून नवीन येणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम उत्तर भारतातील हिमालयीन क्षेत्रात जाणवेल.
सध्या मध्य भारतात प्रभावित असलेल्या हवेच्या उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा परीघ क्षेत्र हा महाराष्ट्रात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीला काहीसा अटकाव जाणवत आहे. अन्यथा थंडीच्या लाटेचा अधिक प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असता. म्हणून तर सध्या केवळ सुसह्य थंडी सध्या जाणवत आहे.
सध्या थंडीसंबंधी ठळक इतकेच!
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1614838331564777472?s=20&t=dm6tRfD4sP5XYEI8ZfeVgQ
Winter Cold Weather Forecast Climate