या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…
माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ
१-जळगांवात तीव्र थंडीची लाट-
जळगांव ला आज पहाटे पाच वाजता ९.१ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन सरासरीपेक्षा ६.२ इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची तीव्र लाट अनुभवली गेली.
जळगांव चे दुपारी ३ चे कमाल तापमानही २९.८ अंश से. इतके नोंदवून सरासरीच्या ३.७ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही हूड-हुडी जाणवली.
२-थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –
महाराष्ट्रातील डहाणू नाशिक मालेगाव
बीड यवतमाळ ह्या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
३-थंडीचे दिवस –
आजपासुन नाशिक अहिल्यानगर सांगली सोलापूर सह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देश मधील २६ जिल्ह्यांत पुढील ४ दिवस म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर (लहान एकादशी, आळंदी यात्रे)पर्यंत सध्य:स्थितीत रात्री जाणवणारी थंडीसारखी थंडी जाणवेल, असे वाटते.
इतकेच !







