थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…
माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ
१- अतितीव्र थंडीची लाट-
उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे, थेट सोलापूर जिल्ह्यापर्यंत झेपावल्यामुळे, आज जेऊर (ता. करमाळा) येथे कालच्या पेक्षा किमान तापमान घट होवून अतितीव्र थंडीची लाट जाणवली.
आज तेथील किमान तापमान ९ अंश से. पर्यंत घटले असुन ते सरासरीच्या १४ अंश से. ने खाली आहे. तेथील सकाळी नोंदली गेलेली सापेक्ष आर्द्रता ही आज ५६% असुन ती तेथील अति कोरडे वातावरण दर्शवत आहे.
२- थंडीची लाट –
जळगांव ला आज पुन्हा कालच्या पेक्षा तापमानात घसरण होवून ९. ४ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ते सरासरीच्या ६. ४ अंश से. ने खाली आहे. त्यामुळे तेथे थंडीची लाट अनुभवली गेली.
जळगांव चे आजचे दुपारी ३ चे कमाल तापमानही २९. ८ अंश से. नोंदले गेले असुन ते सरासरीच्या ३.७ अंश से.ने खालावलेले आहे.
३- थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –
महाराष्ट्रातील अहिल्यानगर छ.सं.नगर बीड डहाणू मोहोळ नाशिक नंदुरबार नांदेड सांगली ह्या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
४-आता पुढील ३ दिवस थंडीचे-
आजपासुन बुधवार दि.१२ नोव्हेंबर पर्यंतच्या तीन दिवसात धुळे नंदुरबार जळगांव नाशिक अहिल्यानगर सोलापूर सांगली डहाणू व छ. सं. नगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी तसेच संपूर्ण विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरून रात्री चांगल्याच थंडीची शक्यता जाणवते.
इतकेच!









