मुंबई – तुमच्या पर्सनल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर मालवेअर येण्याची शक्यता असल्याने विंडो ११ डाउनलोड करणे धोकादायक ठरू शकते. विंडो ११ डाउनलोड करताना त्या सोर्सची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सोर्सची माहिती नसेल तर कॉम्प्युटरमध्ये सिस्टिम सॉफ्टवेअरला नुकसान पोहोचविणारा मालवेअर असण्याची दाट शक्यता असते. सिस्को (Cisco) अशा मालवेअरची यादीच प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये वायरस, वॉर्म्स, ट्रोजन वायरस, स्पायवेअर, अॅडवेअर आणि रँसमवेअरचा समावेश आहे.
विंडो ११ डाउनलोड करताना तो मायक्रोसॉफ्ट याच कंपनीचा हवा, अन्यथा ऑपरेटिंग सिस्टिमसोबत मालवेअर येण्याची शक्यता असते, असा इशारा Kasperskyने आपल्या युजर्सना दिला आहे. कारण विंडो ११ ला अद्याप अधिकृतरित्या बाजारात उपलब्ध झालेले नाही.
मालवेअर कसे येतात
नवी ऑपरेटिंग सिस्टिम डाउनलोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धत अवलंबत आहे. विंडो ११ डाउनलोड मायक्रोसॉफ्ट वेबसाइटवर उपलब्ध आहे. परंतु सायबर गुन्हेगार काही अतिरिक्त फायदे देण्याचे आमिष दाखवून अनोळखी युजर्सना जाळ्यात ओढण्याचे काम करतात. वास्तविक हा एक ट्रॅप आहे. कोणत्याही युजरने या ऑफरला एक्सेप्ट केले की, मालवेअर संबंधितांच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो.
मायक्रोसॉफ्ट विंडो ११ कुठून डाउनलोड करावे
विंडो ११ मालवेअरच्या संपर्कात आल्याशिवाय प्रभावी पद्धतीने डाउनलोड करता येऊ शकणार आहे. परंतु अधिकृत सोर्सवरून डाउनलोड करणे आवश्यक आहे. विंडोज इनसायडर प्रोग्राममध्ये सहभाग घेणार्यांसाठी विंडो ११ अधिकृतरित्या उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. अपग्रेड करण्यासाठी सेटिंगवर जाउन अपडेट अँड सिक्युरिटीवर क्लिक करावे. पुन्हा Dev Channel ला अॅक्टिव्ह करण्यापूर्वी विंडोज इनसायडर प्रोग्रामला निवडा.