गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अदाणी विल्मर IPOमध्ये गुंतवणूक करताय? आधी या ९ गोष्टींकडे लक्ष द्या

जानेवारी 27, 2022 | 5:23 pm
in राष्ट्रीय
0
ipo

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२१ मधील आयपीओ महापुराने भारतीय गुंतवणूकदारांना प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावांच्या (आयपीओ) व्यवहारांत खूपच गुंतवून ठेवले. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टेसेसच्या मसुद्याकडे (डीआरएचपी) नजर टाकल्यास २०२२ मधील पहिली तिमाही काही वेगळी नाही हेही लक्षात येईल. कारण, २४ कंपन्या या काळात त्यांचा आयपीओ बाजारात आणत आहेत. आयपीओ जाहीर करणाऱ्या कंपन्यांमध्ये ओराव्हेल स्टेज (ओयो), अदाणी विल्मर, एमक्युअर फार्मा, डेल्हिवरी आदींचा समावेश आहे.

अदाणी विल्मर या अलीकडेच सूचित झालेल्या कंपनीचा ३,६०० कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) येत आहे. फॉर्च्युन या ब्रॅण्डखाली स्वयंपाकाचे तेल विकणारी ही एफएमसीजी कंपनी म्हणजे गौतम अदाणी यांचा अदाणी ग्रुप आणि सिंगापोरस्थित विल्मर ग्रुप यांचा ५०-५० भागीदारीचा जॉइंट व्हेंचर आहे. २७ जानेवारी खुल्या होणाऱ्या तीन दिवसांच्या सार्वजनिक प्रस्तावासाठी दरश्रेणी प्रति समभाग २१८-२३० रुपये निश्चित करण्यात आली आहे. लॉट आकारमान अर्थात गुंतवणूकदाराला अर्ज करण्यासाठी आवश्यक समभागांची किमान संख्या ६५ इक्विटी समभाग एवढी आहे. या इश्यूनंतर कंपनीचे बाजार भांडवल २९,९०० कोटी रुपये होईल आणि हे समभाग ८ फेब्रुवारी रोजी शेअर बाजारांवर सूचित होतील, अशी शक्यता आहे. जर तुम्ही अदाणी विल्मरमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे याबद्दल सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य.

१. कंपनीचा आढावा:
१९९९ मध्ये समाविष्ट झालेली ही एफएमसीजी कंपनी भारतीय ग्राहकांसाठी स्वयंपाकाचे जिन्नस देऊ करते. यांमध्ये खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यांचा समावेश होतो. कंपनी उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक अत्यावश्यक वस्तूही पुरवते. यांमध्ये ओलिओकेमिकल्स, कॅस्टर ऑइल आणि त्यापासून निर्माण झालेले घटक तसेच डी-ऑइल्ड केक्सचा समावेश होतो. कंपनी विविध ब्रॅण्ड्सच्या खाली तसेच व्यापक दरश्रेणीतील उत्पादने देऊ करते आणि त्यायोगे वेगवेगळ्या ग्राहकसमूहांच्या मागण्या पूर्ण करते.

कंपनीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ तीन वर्गांत विभागला जातो (i) खाद्यतेल, (ii) पॅकेज्ड अन्नपदार्थ व एफएमसीजी, आणि (iii) उद्योगक्षेत्रातील अत्यावश्यक घटक. फॉर्च्युन हा कंपनीचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड म्हणजे भारतातील सर्वाधिक विक्री होणारा खाद्यतेलाचा ब्रॅण्ड आहे. कंपनीने खाद्यतेल उत्पादने, राइस ब्रान हेल्थ ऑइल, फॉर्टिफाइड फूड्स, रेडी-टू-कूक सोया चंक्स, खिचडी आदी मूल्यवर्धित उत्पादनांवरील भर कंपनीने वाढवला आहे.

२. कंपनीचे कार्यक्षेत्र:
कंपनीचे १० भारतीय राज्यांमध्ये एकूण २२ कारखाने आहेत. त्यात १० क्रशिंग युनिट्स व १९ शुद्धीकरण कारखान्यांचा समावेश आहे. मुद्रा येथील कंपनीचा शुद्धीकरण कारखाना हा भारतातील सर्वांत मोठा एका स्थळावरील शुद्धीकरण कारखाना आहे. त्याची क्षमता प्रतिदिवस ५,००० मेट्रिक टन आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, अदाणी विल्मरने अतिरिक्त उत्पादन क्षमतेसाठी ३६ टोलिंग युनिट्स भाडेतत्त्वावर घेतली आहेत. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीचे २८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५,५९० वितरक आहेत. ते १.६ दशलक्षांहून अधिक रिटेल आउटलेट्सची मागणी पूर्ण करतात. याशिवाय, कंपनीचे भारतात ८८ डेपो आहेत. सुमारे १.८ दशलक्ष चौरस फुटांच्या एकत्रित जागेत हे डेपो पसरलेले आहेत.

३. आयपीओमागील उद्दिष्ट:
आयपीओद्वारे उभा राहाणारा पैसा भांडवल खर्चासाठी वापरून सध्याच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्याची तसेच नवीन उत्पादन कारखाने विकसित करण्याची कंपनीची इच्छा आहे. हा निधी कर्जांच्या परतफेडीसाठी/मुदतपूर्व परतफेडीसाठीही वापरला जाईल. त्याचप्रमाणे धोरणात्मक अधिग्रहणे आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी त्याचा वापर केला जाईल.

४. वित्तीय बाबी:
कंपनीच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष १९-२१ या काळात १३ टक्के सीएजीआरवर वाढ झाली आहे. नफ्याच्या आघाडीवर, कंपनीने याच काळात निव्वळ नफ्यात ३९ टक्के सीएजीआरवर वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २२च्या पहिल्या सहामाहीमध्ये कंपनीने वरील तसेच निम्न दोन्ही स्तरांवर दमदार वाढ साध्य केली आहे. मात्र, कंपनीचे ईबीआयटीडीए मार्जिन कमीजास्त होते. एकंदर वित्तीय आकडेवारी चांगली आहे.

५. प्रतिस्पर्ध्यांशी तुलना:
कंपनीच्या सूचित प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये मॅरिको इंडिया आणि एचयूएल यांचा समावेश होतो. मूल्यांकनाच्या निकषावर, इश्यूनंतरचा टीटीएम पीई ३७.६ पट आहे (इश्यूच्या दरश्रेणीच्या वरील टोकावर).

६. स्पर्धा:
अदाणी विल्मर बाजारपेठेत आघाडीच्या स्थानी आहे. यामुळे कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आघाडीच्या जागतिक पुरवठादारांकडून कच्चा माल खरेदी करणे सुलभ होते. कंपनीकडे अॅग्रीबिझनेस उद्योगातील ४० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असलेली वरिष्ठ व्यवस्थापन टीम आहे. अदाणी ग्रुपच्या पाठिंब्यामुळे आणखी काही लाभ कंपनीला मिळतात.

दुसऱ्या बाजूला, विल्मर समूह हा आशियातील आघाडीच्या अॅग्रीबिझनेस समूहांपैकी एक आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये बाजार भांडवलाच्या निकषावर ही सिंगापोर एक्स्चेंजवरील सातव्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी होती. अदाणी विल्मरचा सामना जेमिनी एडिबल्स या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या पाम ऑइल प्लाण्टेशन कंपनीशी आहे. ही कंपनीही सुमारे २५ अब्ज रुपयांचा आयपीओ बाजारात आणण्याचे नियोजन करत आहे.

७. वाढीचे धोरण:
कंपनी खाद्यतेल विभागातील आपला बाजारातील वाटा वाढवणार आहे आणि अन्नपदार्थ व्यवसायाचा विस्तार करणार आहे. घनफळाच्या (व्हॉल्युम) निकषावर, खाद्यतेल विभागाचे कंपनीच्या एकूण व्यवसायात ६५ टक्के योगदान आहे. उर्वरित व्यवसाय अन्नपदार्थ आणि औद्योगिक आवश्यक घटकांच्या विभागांतून येतो. कंपनी भारतातील आघाडीची पॅकेज्ड फूड आणि एफएमसीजी कंपनी होण्यावर भर देणार आहे. यासाठी आपले वितरण जाळे कंपनी सर्व मार्गांचा वापर करून वाढवणार आहे. तसेच ब्रॅण्डबाबत जागरूकता वाढवणे, नवीन उत्पादने आणणे तसेच ग्राहकवर्गात वाढ करणे आदींसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

८. लीड व्यवस्थापक:
कंपनीसाठी बूक रनिंग लीड व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचडीएफसी बँक, बीएनबी परिबास, कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन, बोफा सिक्युरिटीज आणि क्रेडिट सुईस काम करत आहेत. लिंक इंटाइम इंडिया हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

९. समभागधारक कोटा:
कंपनीने आपल्या नेट इश्यूपैकी सुमारे ५० टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखून ठेवला आहे, ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला आहे. उर्वरित १५ टक्के भाग असंस्थात्मक ग्राहकांमध्ये वितरित केला जाईल. कंपनीने १०७ कोटी रुपयांचे इक्विटी समभाग आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा बँक जप्त केलेल्या ११३ ट्रॅक्टरचा करणार लिलाव; बँकेची वसूल मोहिम सुरुच

Next Post

सीए इन्स्टिटयूटचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जांबूसरिया ३० जानेवारीला नाशिकला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
NASHIKICAIPresident

सीए इन्स्टिटयूटचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जांबूसरिया ३० जानेवारीला नाशिकला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011