सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी मिळणार निधी? केंद्र सरकारकडे राज्याच्या सहकार मंत्र्यांनी केली मागणी

by Gautam Sancheti
जुलै 1, 2025 | 6:36 am
in संमिश्र वार्ता
0
Gus TThboAAQSyV 1024x567 1

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र सरकारने प्रायोजित केल्यानुसार अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. केंद्राने या बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी, केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिली.

नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहकार मंत्रालयाच्या ‘मंथन’ उच्चस्तरीय बैठकीमध्ये सहकार क्षेत्राच्या विकासावर सखोल चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी आणि देशभरातील विविध राज्यांचे सहकार मंत्री, सचिव यांसह सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 च्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत सहकार क्षेत्रातील सुधारणा, डिजिटल सक्षमीकरण, प्राथमिक सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि नव्या राष्ट्रीय सहकारी धोरणाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती बँकांपैकी 23 बँकां सक्षमपणे कार्यरत आहेत. मात्र, उर्वरित सात बँका डबघाईला आलेल्या आहेत. या बँकांना निधी उपलब्ध करून देऊन त्यांना पूर्ववत करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुलभ होईल आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.

तसेच राज्यातील 21,000 प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स) डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, गट सचिवांची संख्या वाढविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी अर्थसहाय्य करावे, अशी मागणी ही केंद्राकडे केली.

सहकारी संस्थांनी केवळ कर्जवाटप आणि व्याज वसुलीपुरते मर्यादित न राहता, दुग्ध व्यवसाय, खरेदी-विक्री आणि अन्य व्यवसायांद्वारे स्वतःला सक्षम करावे, हा आमचा उद्देश आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची गरज अधोरेखित केली. सहकार क्षेत्र हे ग्रामीण भारताच्या विकासाचे मेरुदंड आहे. सहकारी संस्थांनी अधिक प्रभावी आणि पारदर्शी पद्धतीने काम करून शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीत कृषी, सहकार, दुग्ध व्यवसाय, खरेदी-विक्री संघटनांची भूमिका आणि नव्या सहकारी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र-राज्य समन्वय वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 च्या पार्श्वभूमीवर ही ‘मंथन’ बैठक सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयातून सहकारी संस्थांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती…सुजाता सौनिक यांच्याकडून पदभारही स्वीकारला

Next Post

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास…दिला हा संदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ईव्ही कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास 2 e1751332202241

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास…दिला हा संदेश

ताज्या बातम्या

Gw3d92jXUAErPq5

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड

जुलै 28, 2025
cbi

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटीत टोळीविरुद्ध सीबीआयची मोठी कारवाई ; तिघांना अटक

जुलै 28, 2025
Untitled 53

देशातील ही मोठी कंपनी करणार नोकरकपात…१२ हजार कर्मचा-यांना मिळणार नारळ

जुलै 28, 2025
cm gadkari hospital 1024x784 1

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 28, 2025
Untitled 52

राज – उध्दव यांच्या २० मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं…सामनामधून देण्यात आली ही माहिती

जुलै 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्वाच्या कामांकडे लक्ष द्यावे, जाणून घ्या, सोमवार, २८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 27, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011