इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क हे जगप्रसिद्ध कंपनी कोका कोला खरेदी करणार या चर्चांना उधाण आले आहे. मस्क यांनी सलग दोन दिवसात दोन ट्विट करुन जगभरातच खळबळ उडवून दिली आहे. मस्क यांनी नुकतीच ट्विटरची खरेदी केली आहे. त्यानंतर आता त्यांचा रोख कोका कोला कडे असल्याचे बोलले जात आहे.
सध्या जगाच्या नजरा इलन मस्कच्या ट्विटवर लागल्या आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी, कोण आणि कोणती मोठी घोषणा करेल हे सांगता येत नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी गेल्या दोन दिवसांत कोका-कोलाबद्दल एकामागून एक ट्विट केले. आधी त्यांनी मजेदार पद्धतीने कोका-कोला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या घोषणेबद्दल ट्विट केले आहे.
मस्क यांनी काल ट्विट केले की ते कोका-कोला खरेदी करणार आहेत. जेणेकरून त्यांना त्यात कोकेन परत मिळू शकेल. आज त्याच ट्विटच्या ट्रेंडमध्ये त्यांनी नवा नारा दिला आहे. त्यांनी ‘Real Magic पासून फक्त एक sip away’ असे लिहिले आहे, यासोबत त्यांनी एक हसणारा इमोजी देखील शेअर केला आहे. ज्यावरून ते विनोद करत असल्याचे स्पष्ट होते.
“Real magic is only a sip away.”
(Actual slogan of Coca-Cola!!) ??— Elon Musk (@elonmusk) April 28, 2022
कोका कोलाच्या ट्विटवर लोकही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. काही तासांतच त्यांच्या ट्विटवर २४ हजाराहून अधिक रिट्विट्स आले. त्याच वेळी, १७ हजारांहून अधिक जणांनी उत्तर दिले आहे. इलॉन मस्कच्या ट्विटर हँडलवर सध्या ८८ दशलक्षापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मस्क हे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर खूपच सक्रिय असतात.