मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काश्मिर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये करमुक्त करावा, अशी आग्रही मागणी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या मागणीवरुन भाजप पदाधिकाऱ्यांनी विधिमंडळात घोषणाबाजीही केली. आता यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत निवेदन केले. ते म्हणाले की, चित्रपटावर दोन प्रकारचा कर असतो. त्यात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) आणि राज्य सरकारचा (एसजीएसटी) यांचा समावेश आहे. जर, केंद्र सरकारने संपूर्ण देशातच या चित्रपटावरील सीजीएसटी रद्द केला तर त्याचा मोठा परिणाम होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
बघा पवार काय म्हणाले त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1504089290527031298?s=20&t=_GjhkiKKsf1Ukp-0L6MCIw