नवी दिल्ली – बंगळुरूस्थित एका स्टार्ट अप ने एक अनोखी, पॉईंट ऑफ केअर इलेक्ट्रोकेमिकल अर्थात विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली असून ही चाचणी वैद्यकीय नमुन्यांमधून कोविडच्या एकूण केंद्रीकरण झालेल्या अँटिबॉडीजच्या जलद आणि अचूक अंदाजासाठी सहाय्यकारी ठरते.
नाविन्यता आणि विकास संस्था (एसआयडी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांच्या प्रोत्साहनातून सुरु झालेल्या पाथशोध हेल्थकेअर या स्टार्ट अपने कोविड आयजीएम (IgM) आणि आयजीजी अँटिबॉडीजसाठी सेमी-क्वानटेटिव विद्युत रासायनिक एलिसा चाचणी ही अशा प्रकारची पहिलीच चाचणी विकसित करून महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) च्या आवश्यकतेनुसार, फरीदाबादच्या ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (टीएचएसटीआय) इथे प्रामाणिकरणानंतर पाथशोध या स्टार्ट अपला विक्रीसाठी उत्पादन करण्याचा परवाना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) कडून मिळाला आहे.
या अनोख्या तंत्रज्ञानाला आणि उत्पादनाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) त्यांच्या सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड हेल्थ क्रायसिस (सीएडब्लूएसीएच) या कार्यक्रमाअंतर्गत साहाय्य करण्यात आले आहे. आयआयटी मुंबई आणि हैदराबादच्या आयकेपी नॉलेज पार्कमध्ये एसआयएनईच्या माध्यमातून या प्रयत्नाचे समन्वयन करण्यात आले.
तात्पुरत्या कमजोर झालेल्या प्रतिपिंडांचा अंदाज लावून आणि संसर्गाच्या पुनरावृत्ती विरोधातील प्रतिकारशक्तीवर संभाव्य परिणामकारक केंद्रीकरण झालेल्या कोविड प्रतिपिंडांचे प्रमाण मोजण्याची क्षमता अत्यंत निर्णायक आहे. एका संबंधित नोंदी नुसार, ”हे तंत्र कोविड लसींसाठी विशिष्ट प्रतिजनाच्या प्रतिसादासाठी प्रतिपिंडे तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रतिसाद स्पष्ट करण्यात देखील मोठी भूमिका बजावेल आणि त्याद्वारे भविष्यात लसीकरण कार्यक्रमांमध्ये सहाय्यकारी भूमिका बजावेल” असे आंतर विज्ञान विभागाचे अधिष्ठाता सुक्ष्म विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र (आयआयएससी) चे प्राध्यापक आणि पाथशोध चे सह-संस्थापक असलेले प्रा. नवकांत भट यांनी सांगितले.
चाचणी संच दोन भागात येतो. एक म्हणजे हाताने हाताळता येणारा विश्लेषक जो रक्ताचा नमुना वाचतो आणि तपशीलवार अहवाल देतो. दुसरी एक चाचणी पट्टी आहे, जेथे एका बोटाच्या टोकावरून रक्ताचा थेंब घेऊन उपकरणामध्ये टाकला जातो. हाताने हाताळता येणारा विश्लेषक पाच मिनिटांच्या आत निकाल देतो हा निकाल आपल्या भ्रमणध्वनीवर डाउनलोड करता येतो.
पाथशोधचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनय कुमार यांच्या मते, “हे अनोखे तंत्रज्ञान नॅनोमोलर केंद्रीकरणापर्यंत कोविड प्रतिपिंड शोधू शकते. हे तंत्र शिरा किंवा केशिका (बोटावर टोचून) सह सीरम नमुन्यासहीत संपूर्ण रक्त नमुन्यावर कार्य करू शकते. आम्ही पुढील दोन आठवड्यांत बाजारपेठेमध्ये उत्पादन विक्रीसाठी ठेवण्याची योजना आखली आहे. पाथशोधची सध्याची उत्पादन क्षमता दरमहा सुमारे १ लाख चाचण्या असून आम्ही उत्पादन पायाभूत सुविधा वाढवून हे उत्पादन आणखी वाढवू शकतो.”
या तंत्रज्ञानाबद्दल अधिक तांत्रिक माहिती वैद्यकीय संग्रह (मेडआरक्झिव्ह) वर उपलब्ध असलेल्या प्रिंप्रिंटवर मिळू शकेल https://doi.org/10.1101/2021.05.04.21256472 आणि आणि पाथशोध हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनय कुमार (vinay.k@pathshodh.com, 9108934728) यांचाशी संपर्क साधू शकता.