कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात लागू करण्यात आलेला कडक लॉकडाऊन आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे उद्यापासून सर्व दुकाने सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी केलेले आहे. या शासन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकारने येत्या १ जून पर्यंत राज्यामध्ये कलम १४४ लागू केले आहे. नाशिकमधील क़क लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकारने लागू केलेले आदेश पूर्वीप्रमाणे लागू होणार आहेत.
असे असतील निर्बंध
◼️ जीवनाश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत सुरु राहतील.
◼️ मेडीकल, वैद्यकीय आस्थापना २४ तास सेवा पुरवू शकतील.
◼️ दूध विक्रीसाठी सकाळी आणि सायंकाळी मुभा असेल
◼️ भाजीपाला विक्री करता येईल. त्यासाठी सकाळीच परवानगी असेल
◼️ पावसाळी पूर्व आणि पूर्व हंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरु ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेती निविष्ठा आणि अवजारे यांच्या आस्थापना सकाळच्या सुमारास सुरु असतील .
◼️ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्था सुरु ठेवण्यात आली असल्यामुळे या क्षेत्राचे निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना या सकाळी ७ ते ११ या वेळेत वेळेत सुरु राहतील. त्यासाठी त्यांना संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक असणार आहे. मात्र वाशिंग सेंटर आणि कार डेकोर इतर संबंधित आस्थापना बंद असणार आहेत.
◼️ जिल्ह्यातील सर्व कषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू होतील
अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!