इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगत आपल्या समाजात काही नात्यांना आगळे वेगळे स्थान असते. उदाहरणार्थ आई आणि मुलगा, आई – वडील व मुलगा, वडील आणि मुलगा, आजी – आजोबा आणि नातवंडे तसेच पती-पत्नीचे नाते हे देखील आगळेवेगळे असते. या नात्यांमध्ये विश्वास प्रेम जिव्हाळा आपुलकी याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. परंतु पतीच्या जीवनात जर एखादी तिसरी व्यक्ती आली तर मात्र पत्नीला ते कदापि सहन होत नाही. असा जणू काही सार्वत्रिक नियमच आहे. कारण सर्वत्र हा नियम लागू होतो. पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्या, छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात. कधी कधी काही वाद हे टोकाला देखील जातात. अनेकदा दोघांमध्ये येणारी तिसरी व्यक्ती या सगळ्यासाठी कारणीभूत असते. मात्र, सध्या जगभरात एका बायकोची जबरदस्त चर्चा होत आहे.
एका पत्नीने चक्क आपल्या पतीसाठी वेगळी जाहिरात दिली आणि सध्या त्याची चर्चा सुरू आहे, बायकोच आपल्या नवऱ्यासाठी एक, दोन नव्हे तर ३ गर्लफ्रेंड शोधत असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. पतीच्या आनंदासाठी तिने हा पुढाकार घेतला असून पत्नीने याची एक भन्नाट जाहिरात दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर याची तुफान चर्चा रंगली आहे. जाहिरात देऊन महिलेने आपल्या पतीसाठी तीन गर्लफ्रेंड शोधण्याची घोषणा केली आहे. सध्या तिने एका गर्लफ्रेंडची भरतीही केली असून अजून दोन पोस्ट या रिक्त असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला देखील अशीच पत्नी लाभावी जी अशी जाहिरात देईल असे काही पतींना वाटणे साहजिक आहे.
पत्थीमा (वय ४४) हिने जाहिरात देऊन ही घोषणा केली होती. त्यानंतर ती आता अशा महिलांचा शोध घेत आहे, ज्या तिच्या पतीला खूश ठेवतील आणि त्याला त्याच्या कामान मदत करतील. या बदल्यात ती गर्लफ्रेंडसना महिन्याला 32 हजार रुपये पगार देणार आहे.
एका रिपोर्टनुसार, पत्थीमाने याबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने पती, मुलं आणि घराची देखभाल करणाऱ्या महिलांचा शोध घेतल्याचं म्हटलं आहे.
पत्थीमाने दिलेल्या माहितीनुसार, अर्ज करणाऱ्या महिलांची HIV टेस्ट होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांचे वय 30 ते 35 वर्षांदरम्यान असावे, त्यांच्याकडे डिग्री असावी. तसेच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत असेल. तिची ही अनोखी ऑफर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पत्थीमा डिप्रेशनचा सामना करत आहे त्यामुळे ती आपल्या पतीला खूश ठेवू शकत नाही. पत्थीमाने व्हिडीओमध्ये तिच्या कुटुंबात आता पतीसोबत गर्लफ्रेंड देखील सहभागी झाल्याचं म्हटलं आहे.
एकत्रच आणि एकाच घरात राहू, एकमेकांची काळजी घेऊ असं म्हटलं आहे. तसेच मी खात्री देते की, आमच्यात कोणतचं भांडण होणार नाही असंही सांगितले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हा पत्थीमाचा फेमस होण्यासाठी स्टंट असल्याचं म्हटले आहे. कारण काही असो परंतु अनेक पतींनी आपल्या नशिबी अशी जाहिरात देणारी बायको का येत नाही असे देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
Wife Serching 3 Girl Friend for Husband Social Viral