इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक वेळा पतीने आपल्या पत्नीवर अत्याचार केला, मारहाण केली अशा घटना आपण ऐकतो, तसेच त्या संदर्भातील बातम्या देखील वाचतो. परंतु एखाद्या पत्नीनेच पतीवर अत्याचार केल्याच्या घटना देखील या समाजात घडतात असे काही वेळा आढळून येते. राजस्थानमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.
एका पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात धोलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पत्नीने पतीला 28 वेळा पोलीस ठाण्यात कोंडल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पत्नी सासू आणि मुलांवर अत्याचार करते. यानंतर त्रस्त पतीने कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत असलेले प्रभारी पोलीस अधिकारी वीरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्याच पत्नीवर आपला छळ करण्याचा व जुगार खेळण्यासाठी पैसे खर्च करण्याचा तसेच प्रियकरासोबत मजा करण्याचा आरोप केला आहे. या तरुणाने पत्नीविरुद्ध कोर्टामार्फत गुन्हा दाखल केला आहे.
कथित पीडित पतीने सांगितले की, त्याने पत्नीला प्रियकरासोबत अश्लील बोलतांना पकडले आहे. जेव्हा जेव्हा त्याने या प्रकाराला विरोध केला तेव्हा तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला खोट्या गुन्ह्यात पोलिस ठाण्यात कोंडून ठेवले. त्याच्या पत्नीने या पीडित पतीला 28 वेळा लॉकअपची हवा खाऊ घातली आहे. यासोबतच या तरुणाने आपल्या आईवर आपल्या मुलांवर बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने सांगितले की, त्याच्या पत्नीने विविध महिला गटांकडून सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मेहनत करताच त्याने स्वतः हे कर्ज फेडले. त्याचबरोबर घरखर्चासाठी दिलेले पैसे पत्नीने बेटिंगमध्ये खर्च केले. त्यामुळे अखेर त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
Wife Send Husband in Jail 28 Times in Fake Crime Jaipur Rajasthan Dholpur