नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडिलांच्या दुर्लक्षामुळे १८ महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालकाच्या आईने आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केल्याने याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार संकेत प्रविण बोराडे (३१ रा.आरंभ कॉलेजजवळ,जेलरोड) असे मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयित पित्याचे नाव आहे. सातपूर लिंकरोड भागात राहणाऱ्या विवाहीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार महिला पती पत्नी असून दि. २ ते १२ मे दरम्यान ते मोटवाणी रोड भागात राहत असतांना ही घटना घडली होती. शिवांश संकेत बोराडे (१८ महिने) या बालकाने छोटा मॅजीक क्रेजी बॉल गिळल्याने मृत्यू झाला होता. कौटूबिक मतभेदामुळे संशयिताने अठरा महिन्यांचे घरात बाळ असल्याचे माहित असतांना तसेच छोटा मॅजीक क्रेजी बॉल आणला होता.
वास्तविक मेडिकल फिल्डची आणि छोटा मॅजीक क्रेजी बॉल गिळल्याने बालकाचा मृत्यू होवू शकतो याबाबत माहिती असतांना संशयिताने हे कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिला सकाळच्या सुमारास भाजी आणून घरी परतली असता ही घटना उघडकीस आली होती. शिवांशने मॅजीक बॉल गिळल्याबाबत माहिती असतानाही त्याने दुर्लक्ष केल्याचा तसेच घराशेजारील हॉस्पिटलमध्ये न नेता वेळ वाया घातल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेने केला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.
Wife Complaint Against Husband 18 Months Child Death