विशेष प्रतिनिधी, पुणे
जगभरात कोणत्याही छोट्या-मोठ्या शहरात चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल बसविलेले असतात. वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत सुरू असावी यासाठी हा सिग्नल असतो. या सिग्नलमुळे वाहतूक पोलिस तेथे कायम असण्याची गरज नसते. मात्र, या ट्रॅफिक सिग्नल मध्ये लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचाच लाईट का वापरला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज आपण त्याचेच उत्तर जाणून घेणार आहोत.
रस्त्यावर सुरक्षितपणे वाहतूक रहावी आणि वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी ट्रॅफिक सिग्नल महत्त्नाची बूमिका बजावतो. ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन रंग सोडून अन्य रंग का वापरले जात नाहीत, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. सर्वप्रथम आपण या तीन रंगाचा अर्थ जाणून घेऊ या. लाल लाइट म्हणजे आपल्याला वाहन थांबवावे लागेल. त्यानंतर सिग्नल पिवळा होतो, तेव्हा पुढे जाण्यासाठी तयार व्हा आणि तो हिरवा झाल्यानंतर पुढे जा.
१० डिसेंबर १८६८ रोजी लंडनममधील संसदेसमोर जगातील पहिला ट्रॅफिक लाईट बसविण्यात आला. सदर ट्रॅफिक लाईट हा रेल्वेचे अभियंता जे. के. नाइट यांनी तयार केला होता. सुरुवातीच्या काळात लाल आणि हिरवा असे दोन रंगाचेच लाईट वापरले होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याकाळी रात्री लाईट दिसावा म्हणून त्यात गॅसचा वापर केला जात असे. सुरक्षित, स्वयंचलित आणि इलेक्ट्रिक रहदारी लाईट हे १८९० मध्ये अमेरिकेत तयार केले गेले. व्हापासून जगातील कानाकोपऱ्यात वाहतूक दिवे वापरण्यात येत आहेत.
वास्तविक, इतर रंगांच्या तुलनेत लाल रंग खूप जाड किंवा भडक असून तो दुरूनच दिसतो. तसेच लाल रंगाचा वापर सूचित करतो की, पुढे धोका आहे, आपण थांबावे.
पिवळ्या रंग हा ऊर्जा आणि सूर्याचे प्रतिक मानला जातो. तसेच हा रंग सांगतो की, आपण आपली उर्जा एकत्रित करावी आणि पुन्हा रस्त्यावर चालण्यास सज्ज व्हावे.
हिरवा रंग हा निसर्ग आणि शांततेचे प्रतिक मानला जातो. म्हणजेच, हा रंग धोक्याच्या अगदी उलट आहे. तसेच हा रंग डोळ्यांना शांत करतो. म्हणजे याचा अर्थ असा की, आता आपण कोणत्याही धोक्याशिवाय पुढे जाऊ शकता. अशा प्रकारे हे तिन्ही रंगच ट्रॅफिक सिग्नलच्या लाईटमध्ये वापरले जातात.