मुकुंद बाविस्कर, मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ अभिनेता म्हणून गोविंदाची ओळख आहे. साधारणतः ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये गोविंदाचे चलनी नाणे चालायचे. डान्सपासून अॅक्शनपर्यंत आणि कॉमेडीपासून रोमान्सपर्यंत प्रत्येक पात्रात गोविंदाने चमक दाखवली आहे. आज आपण त्याच्या जिवनाविषयी काही महत्त्वाची बाबी जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे रवीना टंडनपासून ते करिश्मा कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रीं सोबतची त्यांची जोडी सुपरहिट ठरली आणि प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. कालांतराने गोविंदाची कारकीर्द उतारावर असली तरी दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्या काही चित्रपटातील आभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली असली तरी त्यांना पूर्वीसारखी प्रसिद्धी मिळाली नाही.
गोविंदाने आपल्या कारकिर्दीतील या बदलाबद्दल अनेकदा भावना व्यक्त केली आहे. प्रेक्षकांच्या कौतुकामुळे मी प्रसिद्ध झालो पण येथील वाईट स्पर्धा असल्यामुळे इंडस्ट्रीतून बाहेर पडलो, असे तो म्हणतो. नव्वदच्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक गोविंदा आजकाल चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसतो.
बीबीसीशी संवाद साधताना एकदा गोविंदा म्हणाला होता, ‘चित्रपटसृष्टीतील काही जण मत्सरामुळे माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवतात. तसेच प्रत्येकावर वाईट काळ असतो आणि माझाही होता. त्याचा मी बळी झालो. माझ्या चांगल्या कामाची, डान्सची आणि लूकची प्रशंसा झाल्यामुळे काहींना त्रास झाला. म्हणून मी इंडस्ट्रीतून बाहेर पडलो.
गोविंदा कॉमर्समधून ग्रॅज्युएट झाला आहे आणि ग्रॅज्युएशननंतर तो अनेक ठिकाणी नोकरीसाठी गेला पण त्याला नोकरी मिळाली नाही. कदाचित गोविंदाच्या नशिबात हिरो बनणे लिहिले होते म्हणून असे घडले असेच म्हणता येईल.
गोविंदाला ८० च्या दशकात प्रथम एल्विन नावाच्या कंपनीची जाहिरात मिळाली आणि लवकरच ‘तन-बदन’ या चित्रपटात नायक बनण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये दक्षिण अभिनेत्री खुशबू हिरोईन होती. ‘लव्ह 86’ या चित्रपटापासून त्याला यश मिळू लागले होते.
सुमारे ९० च्या दशकापर्यंत ते इंडस्ट्रीत रुजू झाले होते. वास्तविक दशकात या तीन खानांशिवाय बॉक्स ऑफिसवर त्यांच्याशी स्पर्धा करणारा कोणी असेल तर तो गोविंदा होता. एक काळ असा होता की, गोविंदा एका वर्षात सुमारे ९ चित्रपट प्रदर्शित करायचा आणि कमाईही करायचा. ७ ) गोविंदाने ‘हीरो नंबर वन’, ‘हसीना मान जायेगी’, ‘दीवाना मस्ताना’, ‘कुली नंबर वन’, ‘साजन चले ससुराल’, ‘हद करदी आपने’ आणि ‘शोला और शबनम’ असे अनेक चित्रपट दिले आहेत.