विशेष प्रतिनिधी, पुणे
तरुणांना विचारले तर ते सांगतील की सध्याचा जमाना हा जिन्सचा आहे. आकर्षक आणि फॅशनेबल कपडे घालणे हे बहुतांश लोकांना आवडते. त्यातच तरुणांमध्ये तर जीन्स पॅन्टचे मोठे आकर्षण असते. परंतु जीन्स पॅन्टला मोठ्या खिशाबरोबर एक छोटा खिसा देखील असतो, नेमका हा खिसा कशासाठी असतो, हे आपण आज जाणून घेणार आहोत….
जगभरात सुमारे ७० वर्षांपूर्वी निळ्या सूती कापड्याच्या विजारीची म्हणजेच जीन्स पॅन्टची फॅशन युरोप आणि अमेरिकेच्या बाहेर कधीच नव्हती. कदाचित आपल्या देशात त्याकाळी कधीच नसेल. वास्तविक हा प्रत्येक प्रसंगाला अनुरुप असा ड्रेस आहे. कोणत्याही प्रकारच्या कपड्यांशी जुळवून तुम्ही जीन्स पँट घालू शकता. या सर्व कारणांमुळे, आज लोक मोठ्या प्रमाणात जीन्स घालत आहेत. त्यामुळेच असे म्हटले जाते की, जीन्स हे पृथ्वीवरील सर्वात परिधान केला जाणारा कपडा आहे.









