शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विराट कोहलीने दिलेली भेट सचिनने का केली परत? काय होती भेट? (व्हिडिओ)

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2022 | 11:04 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
virat sachin

 

मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहेत. सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानून विराट कोहली मोठा झाला आहे. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त होत होता, तेव्हा विराट कोहली भारतीय क्रिकेट संघात होता. निवृत्त होताना सचिनने विराटला एक अनमोल भेट दिली होती. ही भेट म्हणजे एक पवित्र धागा आहे. जो विराटला त्याचे वडील प्रेम कोहली यांच्याकडून मिळाला होता. सचिन तेंडुलकरने याबाबत सांगितले की, तो त्यांच्यासाठी खूपच भावूक क्षण होता. विराटने दिलेली ती भेट सचिनच्या थेट हृदयाला स्पर्शून गेली होती.

अमेरिकी पत्रकार ग्राहम बेंसिंगर यांना मुलाखत देताना सचिनने ही आठवण सांगितली. आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि अखेरच्या सामन्याबद्दल सचिन म्हणाला, की “ड्रेसिंग रूममध्ये मी एका कोपऱ्यात बसून आपले अश्रू पुसत होतो. तो माझ्यासाठी खूपच भावूक क्षण होता. त्यावेळी विराट माझ्याजवळ आला, आणि मला एक पवित्र लाल धागा दिला. हा धागा त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता. मी काही वेळेपुरता तो माझ्याजवळ ठेवला आणि पुन्हा त्याला परत केला. त्याला सांगितले, की हा धागा अनमोल आहे, तो तुझ्याकडेच असला पाहिजे. ही मौल्यवान वस्तू शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याजवळच असली पाहिजे. तो भावूक क्षण माझ्या आठवणींच्या कप्प्यात नेहमीच राहील”.

सचिनने २४ वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारताकडून २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने आपला अखेरचा कसोटी सामना १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला होता. तो त्याच्या कारकीर्दीतील २०० वा कसोटी सामना होता. सचिन मैदानाबाहेर जात असताना संपूर्ण देश भावूक झाला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिननंतर विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे.
बघा या मुलाखतीचा व्हिडिओ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – कारमधून आलेल्या चार जणांनी युवकाला केली बेदम मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

नाशिक – जिल्ह्यात १ हजार १२० कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात २०५ तर पंधरा तालुक्यात ८७७ रुग्ण

Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात १ हजार १२० कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात २०५ तर पंधरा तालुक्यात ८७७ रुग्ण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011