मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात पेटीएमचे शेअर्स वाईट रितीने कोसळल्यानंतर आता संस्थापक विजय शेखर शर्माचे वक्तव्य आले आहे. वाईट काळ असल्यामुळे पेटीएमची फ्लॉप लिस्टिंग होत असल्याचे विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे. पेटीएमच्या ९७ कम्युनिकेशन्स या मूळ कंपनीचा शेअर लिस्ट होण्याच्या ५० दिवसांच्या आत २१५० रुपयांनी घसरून १,०८१ रुपयांहून खाली आला आहे.
आयएएमएआयच्या इंडिया डिजिटल समिट २०२२ मध्ये विजय शेखर शर्मा म्हणाले, पेटीएमचा आयपीओ अशा वेळी आला जेव्हा शेअर बाजार वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित झाला होता. फायनान्शिअल सर्व्हिसच्या नेतृत्वाखाली मुद्रीकरण सोबत काय होईल यावर पेटीएमचे यश अवलंबून असेल. पेमेंट रेव्हेन्यू लाइन आयटम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या तिमाहीमध्ये आमचे पेमेंटमधून १० कोटी डॉलरचा महसूल उभारण्याचे लक्ष्य आहे. गुंतवणूकदार हे पेमेंटमधून मिळणार्या महसुलाला कमी लेखतात. कमी खर्चात जास्त महसूल उभारण्याचे पेटीएमचे लक्ष्य आहे.
शर्मा म्हणाले, की पेटीएमची तुलना गैरबँकिंग आर्थिक कंपनी बजाज फायनान्ससोबत करायला हवी. बजाज फायनान्स ३०-३२ वर्षांपासून आहे. पेटीएम तीन वर्षांच्याही कमी कालावधीत बजाजच्या तुलनेत अधिक कर्ज उपलब्ध करून देते. आमच्या क्रेडिट व्यवसायासाठी आम्हाला एकाविरुद्ध बेंचमार्क करायला हवे ती आहे बजाज फायनान्स. मॅक्वायरी या परदेशी ब्रोकरेज हाउसने पेटीएमच्या शेअर्सचा स्टॉक प्राइज घटवला आहे. मॅक्वायरीने पेटीएम शेअर्सचा टार्गेट प्राइज घटवून ९०० रुपये केला होता. यापूर्वी मॅक्वायरीने पेटीएमच्या शेअर्ससाठी १२०० रुपयांचे टार्गेट प्राइज दिला होता.