विशेष प्रतिनिधी, नागपूर
माणूस हा हिंस्त्र वाघाच्या शिकारीसाठी (किंवा आताच्या काळात खतरनाक वाघ पाहण्यासाठी) जंगलात जातो. परंतु तोच माणूस हा क्षुल्लक डासांच्या भीतीने जाळीत किंवा मच्छरदाणीत झोपतो, असे म्हटले जाते. अशा या डासांच्या करामतीने सर्वजण रात्रभर हैराण असतात. त्यासाठी नानाविध उपाययोजना केल्या जातात. डास तथा मच्छर माणसाचे रक्त का पितो, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
डास हा एक हानिकारक कीटक असून तो मानवांचे किंवा इतर प्राण्यांचे रक्त शोषून जगतात. केवळ मादी डासच रक्त शोषतात. आपण पाहिलेच असेल की, डास आपले रक्त शोषतात आणि मग तिथून उडून जातात, परंतु डास मानवी रक्त का पितात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याला याची सवय कशी झाली? पूर्वीच्या काळी शास्त्रज्ञांनाही या प्रश्नांचे उत्तर माहित नव्हते, परंतु आता त्यांना उत्तर सापडले आहे.









