तिरुवनंतपुरम – भय किंवा चिंता वाटणे हा मानवाचा स्वभाव आहे. कुणाला वन्य प्राण्यांची भीती वाटते. तर कुणाला घरातील पाल, झुरळ आदींची देखील भीती वाटते. त्यातही अनेकांना कुत्र्याची भीती वाटते. वास्तविक अनेक जण घरी कुत्रा किंवा मांजर पाळतात. त्यामुळे काही जणांना त्यांची फारशी भीती वाटत नाही. परंतु भटके कुत्र्यांपासून सर्वच जण चार हात लांब राहतात. मांजरीच्या बाबतीत तसे होत नाही. परंतु केरळमध्ये कुत्र्यांपेक्षा लोकांना मांजरीची जास्त भीती वाटते. असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. कारण मांजरी या कुत्र्यांपेक्षा जास्त हिंस्र झाल्याचे जिसून येत आहे. मांजरीच्या चाव्यात जखमी होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहेत.
केरळमध्ये गेल्या काही वर्षांत राज्यात मांजरीच्या चाव्याच्या घटनांमध्ये कुत्र्याच्या चाव्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. केवळ यावर्षी जानेवारीत मांजरीच्या चाव्याचे २८,१८६ प्रकरणे नोंदवली गेली, तर कुत्र्यांच्या चाव्याच्या २०, ८७५ घटना घडल्या. मांजरी कुत्र्यांपेक्षा जास्त चावतात. राज्य आरोग्य संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून, मांजरींना चावा घेणाऱ्यांची संख्या कुत्रा चावल्या गेलेल्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
अॅनिमल लिगल फोर्स या प्राणी संघटनेने माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला होता. त्याला उत्तरादाखल देण्यात आलेल्या आकडेवारीतून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. इ. स. २०१३ आणि २०२१ दरम्यान कुत्रा आणि मांजरीच्या चाव्याव्दारे डेटासह रेबीज लसींवर खर्च केलेल्या रकमेची माहिती देखील देण्यात आली आहे. या आकडेवारी नुसार २०१६ पासून मांजरीच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१६ मध्ये मांजरीच्या चाव्याव्दारे १,६०,५३४ लोकांनी उपचार केले. तर कुत्र्याच्या चाव्याव्दारे १,३५,२१७ प्रकरणे नोंदली गेली. दक्षिणी राज्यात २०१४ ते २०२० या काळात मांजरीच्या चाव्याच्या घटनांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मांजरीच्या चाव्याची प्रकरणे अशी (वर्ष आणि घटना)
२०१७ – १,६०,७८५
२०१८ – १,७५,३६८
२०१९ – २,०४,६२५
२०२० – २,१६,५५१