नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अनेक जण हेल्मेट घालत नाहीत. काही जण बाईकला हेल्मेट लावतात पण डोक्यावर घालत नाहीत. हेल्मेट घालणे का आवश्यक आहे हे दर्शविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात दिसून येते आहे की, हेल्मेट किती महत्त्वाचे आहे. व्हिडिओत दिसते की, एक दुचाकी चालक भरधाव वेगाने जात असतो. तेवढ्यात तो दुचाकीवरील नियंत्रण घालवतो त्यामुळेच तो अतिशय जोरदारपणे रस्त्यावर कोसळतो. सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेले असते. त्यामुळे त्याला फारशी दुखापत होत नाही. मात्र, तत्पूर्वी त्याची दुचाकी रस्त्यातील पथदीपालाही धडक देते. त्यामुळे हा दुचाकीस्वार अपघातानंतर उठून उभा राहत असतानाच पथदीप त्याच्या डोक्यावर कोसळतो. त्यामुळे तो पुन्हा खाली पडतो. मात्र, हेल्मेटमुळे त्याचे प्राण वाचतात. बघा, हा अतिशय थरारक व्हिडिओ
God helps those who wear helmet !#RoadSafety#DelhiPoliceCares pic.twitter.com/H2BiF21DDD
— Delhi Police (@DelhiPolice) September 15, 2022
Why Helmet Is Compulsory See This Thrilling Video
Delhi Police Road Safety Accident