मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्याचा आवाज कसा असतो की जणू काही त्याला दैवी लाभलेली असते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर असो, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या आवाजाचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. अशाच प्रकारे आणखी एक जादुई आवाज म्हणजे मोहम्मद रफी होय. आजही त्यांचे गाणे कोठेही लागले तरी रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात.
मखमली आवाजाचा बादशाह आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सदाबहार गायक मोहम्मद रफी यांची काल जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म दि. 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. रफी साहेबांनी प्रेम, दु:ख, सुख, देशभक्ती, भजन, बालगीत अशी जवळपास प्रत्येक मूडची गाणी गायली. त्यांना शहंशाह-ए-तरन्नम या नावानेही ओळखले जात होते.
रफी साहेब फार कमी बोलत. तसेच ते, जास्त विनम्र आणि गोड स्वभावाचे होते. रफी साहेब आपल्या गावात फकीरांच्या गाण्याची नक्कल करत गाणे शिकले आणि एक वेळ अशी आली जेव्हा ते देशातील सर्वाधिक ऐकले जाणारे गायक बनले. पण रफी साहेबांनी हजहून परतल्यानंतर गाणे सोडले होते. एका मौलवींच्या सांगण्यावरून त्यांनी गाणे म्हणणे बंद केले होते.
वास्तविक मोहम्मद रफी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांनी मौलवींच्या सांगण्यावरून चित्रपटांमध्ये गाणे बंद केले. हजला गेले असताना हा प्रकार घडला. हज येथून परत आल्यावर त्यांना काही लोकांनी सांगितले की, आता तू हाजी झाला आहेस. त्यामुळे तू आता सर्व गाणे बंद कर. त्यांनी हे खरोखरच मनावर घेतले आणि त्यांनी गाणे सोडले. याची माहिती मिळताच संपूर्ण बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली.
जवळच्या मित्रांनी त्यांना खूप समजावून सांगितल्यावर रफी साहेब राजी झाले. आणि त्यांनी पुन्हा गायला सुरुवात केली. रफी साहेबांनी हिंदी शिवाय अनेक भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. जवळपास 26 हजार गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
त्यांची काही अप्रतिम गाणी अशी आहेत.
१ ) जीने की राह या चित्रपटाचे गाणे – आने से उसके आये बहार…
२ ) पत्थर के सनम चित्रपटाचे गाणे – पत्थर के सनम तुझे हमने…
३ ) द ट्रेनचे गाणे ऐका – गुलाबी आंखे जो तेरी देखी…
याशिवाय त्यांची शेकडो गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत.