मुंबई – बॉलीवूड मध्ये म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. परंतु काही चित्रपट मात्र वादग्रस्त ठरतात. तसेच काही चित्रपटांना विरोध देखील होत असतो. हा विरोध वेगवेगळ्या पातळीवर असतो, कधी राजकारण्यांकडून तर कधी सामाजिक संघटनांकडून चित्रपटांना विरोध होतो. परंतु बरेचदा विरोध झालेले हे चित्रपट मात्र नंतर मोठ्या प्रमाणावर चालतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. तसेच बॉक्स ऑफिसवर गल्ला देखील जमा करतात. असा अनुभव आहे आता देखील सध्या एक चित्रपट असाच वादग्रस्त ठरला आहे ‘अतरंगी रे ‘ हा चित्रपट दि. २४ डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.
सिनेकलाकार धनुष, सारा अली खान आणि अक्षय कुमार यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत असतानाच दुसरीकडे काही लोकांकडून या चित्रपटावर बहिष्कारही घातला जात आहे. ट्विटरवर#Boycott_Atrangi_Re ट्रेंड होत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगले प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळले आहे. पण एका कारणामुळे चित्रपटाला विरोध होत आहे. अखेर कोणत्या कारणामुळे ‘अतरंगी रे’ला विरोध होत आहे.
खरेतर ‘अतरंगी रे’ची कथा बिहारमध्ये राहणाऱ्या रिंकू सूर्यवंशी ( कलाकार – सारा अली खान) भोवती फिरते. जिचे लग्न तिच्या संमतीशिवाय तमिळ ब्राह्मण मुलगा विशू ( कलाकार – धनुष) सोबत केले जाते. त्याचवेळी विशूलाही लग्न करायचे नव्हते, पण ‘पकदुआ’ लग्नामुळे त्याचे लग्न होते. यासोबतच रिंकू जादूगार सज्जाद अली ( कलाकार – अक्षय कुमार) याच्या प्रेमात ती पडते.
https://twitter.com/akshaykumar/status/1474084895135698958?s=20
सोशल मीडियावर याला विरोध होत आहे. कारण सोशल मीडिया पोस्टनुसार, काही जणांचा आक्षेप आहे की, चित्रपटात केवळ लव्ह जिहादच दाखवण्यात आलेला नाही, तर त्याचवेळी हिंदूंनाही वाईट दाखवण्यात आले आहे, यात मुलीशी मुलगा हा जबरदस्तीने लग्न करत आहेत. त्याचवेळी, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, एका हिंदू मुलीचे मुस्लिम माणसाच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले आहे, अशा चित्रपटांमुळे समाजात हाच संदेश जाईल.