शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१० एप्रिल हा दिवस होमिओपॅथी दिन म्हणून का साजरा केला जातो?

by Gautam Sancheti
एप्रिल 10, 2022 | 10:31 pm
in इतर
0
homeopathy

 

१० एप्रिल – जागतिक होमिओपॅथीक दिवस

– डॉ. मितल शाह (कॅनडा कॉर्नर, नाशिक. 9822065808)
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्यूअल हॅनीमन यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. वैद्यक शास्त्रातील अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतींपैकी प्रभावी व आधुनिक असे होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे. ज्याचा शोध डॉ. फ्रेडरीक सॅम्यूअल हॅनिमन यांनी लावला.
अतिशय सामान्य कुटुंबात चीनी मातीच्या भांड्यांना रंग देणाऱ्या दांपत्याच्या घरी १० एप्रिल १७५५ रोजी डॉ. सॅम्यूअल हॅनीमन यांचा जर्मनीत जन्म झाला. हॅनिमन यांनी अगदी सामान्य परिस्थितीतून आपले बालपणीचे शिक्षण घेतले व पुढील शिक्षण पैसे नसल्याने इतर भाषांचे ज्ञान अवगत करुन विविध ग्रंथ दुसऱ्या भाषेत रुपांतरीत केले व आपले वैद्यकीय शिक्षण एम.डी.पर्यंत पुर्ण केले. त्यांनी अथक परिश्रम घेऊन like Cures like या सिद्धांतानुसार होमिओपॅथी या नव्या वैद्यक शास्त्राचा शोध लावला. हे आधुनिक शास्त्र विकसित करताता डॉ. सॅम्यूअल हॅनीमन यांना खूपच समस्यांना तोंड द्यावे लागले.

सुरुवातीच्या काळात सहकार्यांच्या त्रासामुळे त्यांना स्वत:चे घरदार सोडावे लागले त्यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तरीही जिद्द व चिकाटीने रुग्णांवर अभ्यास करुन स्वत:वर व मित्रांवर प्रयोग करुन त्यांनी विविध होमिओपॅथी औषधी शोधून काढल्या व १७९६ साली होमिओपॅथी जगासमोर आणली. त्यांनी सुमारे ३० पेक्षा जास्त होमिओपॅथी ग्रंथ लिहिले. होमिओपॅथीच्या गुणकारी औषधामुळे रुग्ण मुळापासून बरे होऊ लागले. त्यामुळे इतर डॉक्टरदेखील होमिओपॅथीचा अभ्यास करु लागले व होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार होऊ लागला. काही वर्षातच डॉ. केंट, डॉ. बोरीक, डॉ. एलेन यांनीदेखील होमिओपॅथीचे ग्रंथ लिहिले व हळुहळु होमिओपॅथी संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली. भारतात सर्व प्रथम पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता येथे होमिओपॅथी उदयास आली.

संपूर्ण जगात सर्वात जास्त भारतात होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत. आज केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने होमिओपॅथीचा राष्ट्रीय स्तरावर विकास झाला आहे. आज भारतात सुमारे १८९ होमिओपॅथी कॉलेज आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ४६ कॉलेज आहे. तसेच सुमारे ६० हजारपेक्षा जास्त नोंदणीकृत डॉक्टर्स महाराष्ट्रात आहेत. सध्याच्या उपचार पद्धतींपैकी होमिओपॅथी ही एक प्रभावी शास्त्र उपचार पद्धती आहे.
होमिओपॅथीबाबत सांगायचे झाले तर सोरा, सिफीलीस व सायकोसिस या तीन मायझम्स (त्रिदोष)च्या संतुलनात बिघाड होतो तेव्हा आजार निर्माण होतो, त्यावेळी Like Cures Like या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या लक्षणा स्वरुप सारखे होमिओपॅथीक औषध दिले जाते व या औषधाने त्रिदोषांचा समन्वय साधला जातो. या समन्वयामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते व आजार आपोआप समुळ नष्ट होतो. होमिओेपॅथी उपचार पद्धतीमध्ये औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ज्यात रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्या घटनांचा रुग्णांच्या मनावर कोणकोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण घटनेचा कसा विचार करतो या सारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात.

होमिओपॅथी ही खूप लवकर, कमी वेळात रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या आजारावर अवलंबुन आहे. उदा. थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालविता येतो. परंतू गंभीर, आजार जिर्ण झाल्यावर आजाराची गुंता वाढल्यावर रुग्ण आल्यास ती गुंता सोडविण्यास थोडा वेळ लागतो. होमिओपॅथीने आज टॉन्सिलायटीस, अ‍ॅपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मुळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रक्रिया न करता बरे केले जातात.

तसेच आजार परत उद्भवू नयेत म्हणूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास सोपे आहे. या उपचार पद्धतीचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘व्हायटल फोर्स’ म्हणजेच चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते. अशा या आधुनिक होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार झाल्यामुळे रुग्णांचा कल प्रचंड प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे आज सर्दी, खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत आजार असलेले रुग्ण होमिओपॅथी उपचार घेत आहेत. अतिशय सहज आणि सोपा, आपल्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम न करणारा असा हा होमिओपॅथीचा उपचार आपणही नक्की घ्यावा व आरोग्य संपन्न व्हावे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर तालुक्यात आगीचे सत्र सुरूच; चौथ्यांदा ऊस जळाल्याची घटना

Next Post

बूस्टर डोस घ्यायचा की नाही याचा विचार करताय? मग, हे वाचाच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
संग्रहित फोटो

बूस्टर डोस घ्यायचा की नाही याचा विचार करताय? मग, हे वाचाच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011