गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

११ लाखांच्या सुंदर महापैठणीची महाविजेती थोड्याच वेळात ठरणार; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

by Gautam Sancheti
जून 26, 2022 | 2:03 pm
in मनोरंजन
0
FVxfLhqUEAAm hw

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठी वरील होम मिनिस्टर ही मालिका महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे त्या नंतर या शोचे महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आले आणि प्रचंड गाजले. अकरा लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये चुरस रंगली. महामिनिस्टर महाअंतिम सोहळा दि. 26 जून रोजी रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार असून होम मिनिस्टर खेळ सख्यांचा चारचौघींचा 27 जून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वांचे लाडके आदेश भाऊजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात हा शो पोहोचविला. अगदी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक शहरातच नव्हे तर त्यांनी अनेक छोट्या शहरातील कॉलनी मध्ये महिलांबरोबर म्हणजेच आपल्या वहिनीसमवेत हा शो मधील खेळ खेळून रंगत आणली. संपूर्ण राज्यात महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अठरा वर्षाहूनही जास्त काळ महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे.

या शो मध्ये अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखले, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात एक लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि आता या दहा जणींमध्ये येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात अकरा लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.

या पर्वाच्या सुरुवातीपासून अकरा लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कोणते शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी कोणती नगरी ठरणार? हे प्रेक्षकांना रविवारी महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळेल. या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार 27 जूनपासून होम मिनिस्टरचा ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतील.

नाशिक केंद्राच्या विजेत्या डॉ. रुपाली पाखरे लढणार महाअंतिम सोहळ्यामध्ये पहा त्यांची ही #WinningMoment.

'महामिनिस्टर', महाअंतिम सोहळा. २६ जून, संध्या ७ वा. नक्की पहा #MahaMinister #HomeMinister #zeemarathi pic.twitter.com/FItHzJ5k6D

— Zee Marathi (@zeemarathi) June 21, 2022

काही दिवसांपूर्वी 11 लाखांच्या पैठणीवरून काही जणांनी या कार्यक्रमाला ट्रोल केले होतं. त्यावर उत्तर देताना आदेश बांदेकर म्हणाले होते की, सध्या या 11 लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहिती नाही आहे की ती मी देणार नाही. तर ती पैठणी प्रायोजकांकडून येते, झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा फक्त निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही, तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो.

गेली 18 वर्षे सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज 1 पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत ना,ही त्यामुळे हे ट्रोलिंग होते. तसेच 11 लाखांची पैठणी ही येवले शहरामध्ये बनते आणि ही पैठणी बनवणारे कारागीर मूकबधीर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतो. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होते. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता या कार्यक्रमाची म्हणजेच अंतिम सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

who will win 11 lakh paithani mahaminister tv show zee marathi final yeola

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंडखोरांचे हॉटेल राजकारण पहिल्यांदाच होतेय का? असा आहे त्याचा भारतातील रंजक इतिहास

Next Post

अभिमानास्पद! नाशिकच्या अशोका बिल्डकॉनला मिळाले दक्षिण अमेरिकेत रस्ता निर्मितीचे काम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20220626 WA0009

अभिमानास्पद! नाशिकच्या अशोका बिल्डकॉनला मिळाले दक्षिण अमेरिकेत रस्ता निर्मितीचे काम

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011