रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोण जिंकणार ११ लाखांची सुंदर महापैठणी? संपूर्ण राज्यातील महिलांची उत्सुकता शिगेला

जून 24, 2022 | 5:34 pm
in मनोरंजन
0
FVxfLhqUEAAm hw

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठी वरील होम मिनिस्टर ही मालिका महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे त्या नंतर या शोचे महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आले आणि प्रचंड गाजले. अकरा लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये चुरस रंगली. महामिनिस्टर महाअंतिम सोहळा दि. 26 जून रोजी रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार असून होम मिनिस्टर खेळ सख्यांचा चारचौघींचा 27 जून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वांचे लाडके आदेश भाऊजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात हा शो पोहोचविला. अगदी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक शहरातच नव्हे तर त्यांनी अनेक छोट्या शहरातील कॉलनी मध्ये महिलांबरोबर म्हणजेच आपल्या वहिनीसमवेत हा शो मधील खेळ खेळून रंगत आणली. संपूर्ण राज्यात महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अठरा वर्षाहूनही जास्त काळ महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे.

या शो मध्ये अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात एक लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि आता या दहा जणींमध्ये येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात अकरा लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.

या पर्वाच्या सुरुवातीपासून अकरा लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कोणते शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी कोणती नगरी ठरणार? हे प्रेक्षकांना रविवारी महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळेल. या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार 27 जूनपासून होम मिनिस्टरचा ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतील.

https://twitter.com/zeemarathi/status/1539186367141396480?s=20&t=dsIkHBgrv9wMWTEf6n6h2g

काही दिवसांपूर्वी 11 लाखांच्या पैठणीवरून काही जणांनी या कार्यक्रमाला ट्रोल केले होतं. त्यावर उत्तर देताना आदेश बांदेकर म्हणाले होते की, सध्या या 11 लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहिती नाही आहे की ती मी देणार नाही. तर ती पैठणी प्रायोजकांकडून येते, झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा फक्त निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही, तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो.

गेली 18 वर्षे सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज 1 पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत ना,ही त्यामुळे हे ट्रोलिंग होते. तसेच 11 लाखांची पैठणी ही येवले शहरामध्ये बनते आणि ही पैठणी बनवणारे कारागीर मूकबधीर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतो. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होते. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता या कार्यक्रमाची म्हणजेच अंतिम सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

who will win 11 lakh paithani mahaminister tv show zee marathi final yeola

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘अंतर्गत कलहातूनच ठाकरे सरकार कोसळेल’ भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा दावा

Next Post

अशी आहे एकनाथ शिंदे यांची जीवन कहाणी: मुलगा व मुलीच्या अपघाती मृत्यूने शिंदेंनी सोडले होते राजकारण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
eknath shinde e1655791206878

अशी आहे एकनाथ शिंदे यांची जीवन कहाणी: मुलगा व मुलीच्या अपघाती मृत्यूने शिंदेंनी सोडले होते राजकारण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011