विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर उपायोजना म्हणून लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु अद्यापही प्रचंड लोकसंख्येने असलेल्या तरुणांच्या गटाला लशीचा डोस मिळालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जगभरात अद्यापही कायम असून लशीचा डोस घेतलेल्या लोकांना देखील याचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे की, लसीकरण केलेले लोक डेल्टा व्हेरिएंटचे वाहक बनू शकतात आणि त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये अशी प्रकरणे आढळू लागली आहेत. अनेक देशातील लोक कोरोनाच्या तिसर्या लाटेबद्दल प्रत्येकजण सतर्क आहे. तरीही जगातील मोठ्या लोकसंख्येस संसर्ग होण्याचा धोका आहे, कारण मोठ्या संख्येने लोकांना अद्याप लशीचा एक डोसही मिळालेला नाही. जगात मोठ्या संख्येने असलेल्या तरुणांना लस दिली जात नाही, त्यांनी सतर्क असले पाहिजे.
डब्ल्यूएचओ वैज्ञानिक आणि साथीच्या रोगशास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणतात की, जगात डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार पूर्वीपेक्षा वेगवान झाला आहे. कारण लॉकडाऊन विश्रांतीनंतर आता लोकांचा जमाव वाढला असून गर्दीही वाढली आहे, त्यामुळे विषाणूचे प्राणघातक रूप त्याचे जाळे वेगाने पसरत आहे. ज्यांना लस देण्यात आली आहे ते देखील या प्रकाराला बळी पडत आहेत, काही लोकांना संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत, परंतु ते व्हायरसचे वाहक बनत आहेत.
डब्ल्यूएचओच्या मते, आतापर्यंत जगातील 24.7 टक्के लोकांना लस कमीतकमी एक डोस मिळाला असून आतापर्यंत 300 कोटी डोस दिले गेले आहेत. परंतु सर्वात मोठी समस्या अशी आहे की, मागासलेल्या, गरीब आणि कमी उत्पन्न असणार्या देशांमध्ये लशीकरण सुरू झाले नाही किंवा फारच कमी लोकांना लस दिली गेली आहे. सहाजिकच हे देश या साथीचे सहज बळी ठरू शकतात. प्राणघातक अशा डेल्टा प्रकाराने जगातील 104 देशांमध्ये शिरकाव केला आहे.
या संघटनेने असा इशारा दिला आहे की, कोणालाही कोरोनाशी संबंधित थोडीशी समस्या वाटत असेल तर स्वत: ला विलग करा, आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच बाहेर पडा, संक्रमणामुळे असे लोक गंभीर लक्षणे दर्शविणार नाहीत परंतु इतर लोकांसाठी ही माणसे अडचणीत येऊ शकतात. डॉ. मारिया म्हणतात की, ज्यांना लसचे दोन्ही डोस मिळाले नाहीत त्यांच्यात डेल्टाचा धोका जास्त असतो. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये, 18 वर्षाखालील मुलांना अद्याप लस दिली जात नाही. तर दुसरीकडे, लसांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांना देखील लसकरण करता येत नाही, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.