विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूने आतापर्यंत ४० लाख लोकांचा बळी घेतलेला आहे. जगभरात लसींचे उत्पादन वाढत असल्याने लोकांच्या जिवात जीव आला आहे. पण भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंट विरोधात कोरोना लसीचा खूपच कमी परिणाम दिसत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. परंतु त्यातल्या त्यात दिलासादायक बाब हीच आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर गंभीर संसर्ग आणि मृत्यू टाळता येऊ शकतो.
कोरोना विषाणूच्या अनेक म्युटेशनमध्ये बदल होत असल्याने असे परिणाम दिसत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे लसीचा परिणामही कमी जाणवू शकतो. भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये झालेल्या बदलामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटची निर्मिती झाली आहे. विषाणू अधिक परिणामकारक झाल्यास त्याच्या सक्षम रूपांना एक जैविक लाभ मिळतो. त्याला म्युटेशन असे म्हणतात. या माध्यमातून तो लोकांमध्ये खूपच सहज पसरतो.
विषाणूच्या या नव्या अवताराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा चिंता व्यक्त केली आहे. जगभरातील २९ देशांमध्ये विषाणूच्या बदललेल्या अवताराने सर्वात जास्त विद्ध्वंस करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या बदलणार्या रूपाला आणि त्याच्या जिनोमला डिकोड करण्यासाठी देशातील अनेक संस्था दिवस-रात्र संशोधन करत आहेत.
भारतात आतापर्यंत कोरोनाच्या बदललेल्या अवताराबद्दल रुग्ण आढळले नाहीत. देशात विद्ध्वंस करणार्या डेल्टा व्हेरिएंटचेही अनेक रूप समोर आले आहेत. परंतु दक्षिण अमेरिकेत लॅम्ब्डा या विषाणूच्या बदलेल्या अवताराबाबत अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे आयसीएमआरच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, डेल्डा प्लस या विषाणूचे महाराष्ट्रात २१ रुग्ण असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. राज्यभरातून साडेसात हजार नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले.
लसीचे दोन्ही डोस आवश्यक