मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे १४ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या लोकप्रिय क्विझ शो च्या या सीझनमध्ये नवीन ट्विस्ट येणार असल्याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.
यापूर्वी या शोमध्ये बक्षीस रक्कम एक कोटी रुपये होती, ती वाढवण्यात आली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून ‘केबीसी’ क्विझ रिअॅलिटी शोचे होस्ट होते. पहिल्या सीझनमध्ये त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाख रुपये घेतले. मात्र यानंतर प्रत्येक वेळी सीझन 11 पर्यंत त्याची फी वाढून आता 3 कोटी 50 लाख झाली आहे.
पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून केबीसीचे हे पर्व सुरु होणार आहे. हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तर देऊन लाखो रुपये जिंकता येतात. पण हे प्रश्न नेमकं कोण तयार करतं? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. नुकतचे याचे उत्तर समोर आले आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. बॉलिवू़डचे महानायक हा शो होस्ट करत असल्यामुळे या शोकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. केबीसीमधील प्रश्न कोण तयार करतात याबाबतचा उलगडा झाला असून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील प्रश्न तयार करण्याचे काम हे तज्ज्ञांच्या एका पॅनलद्वारे केले जाते. या पॅनलची नेमणूक ही निर्मात्यांद्वारे केली जाते.
या पॅनलमध्ये केबीसीचा निर्माता सिद्धार्थ बसूचाही सहभाग असतो. सिद्धार्थ बसू हा या शोचा निर्माता आहे. तसेच तो उत्तम क्विझ मास्टर देखील आहे. यात सिद्धार्थ बसू आणि त्यांची टीम विविध गोष्टींचा विचार हे प्रश्न तयार करते. हे प्रश्न वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असतात. यात भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथा, खेळ यांसारख्या विविध विषयांचा समावेश असतो. तसेच चालू घडामोडी, बातम्या, कार्यक्रम, भारत आणि जगाचा इतिहास, मनोरंजन आणि स्पर्धकाचा छंद याच्याशी संबंधित प्रश्नांचा देखील यामध्ये समावेश केला जातो.
Who Prepares Question for Kaun Banega Crorepati Program KBC Amitabh Bachhan