शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोण आहे राहुल गांधींचा सिक्युरिटी गार्ड? ज्याच्यावर गुलाम नबी आझाद यांनी केले गंभीर आरोप

by Gautam Sancheti
ऑगस्ट 29, 2022 | 11:25 am
in संमिश्र वार्ता
0
rahul gandhi

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात सध्या मोठी चर्चा आहे ती राहुल गांधी यांच्या सिक्युरीटी गार्डची. तो अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे गुलाम नबी आझाद. ज्येष्ठ नेते असलेल्या आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र, आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पाच पानी पत्रात राहुल गांधींच्या सिक्युरीटी गार्डचा उल्लेख केला आहे. राहुल हे त्याचे जास्त ऐकतात आणि ज्येष्ठ नेत्यांचे नाही असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की राहुल यांचा हा सिक्युरीटी गार्ड कोण आहे…

असे म्हटले जाते की, पक्षांच्या नेत्यांपेक्षा कधीकधी त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते हे अधिक प्रबळ ठरतात, त्यामुळे मुख्य नेत्यांऐवजी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांनाच जास्त भाव येतो किंवा भाव असतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो की, सर्वसामान्य कार्यकर्ते त्या नेत्यांपुढे पोहोचू शकत नाहीत किंवा त्या नेत्यांऐवजी ही मंडळीच निर्णय घेतात की काय असाही आरोप केला जातो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली तेव्हाही असाच आरोप केला गेला आणि त्या आजूबाजूच्या मंडळींना बडवे असा शब्द वापरला गेला. त्याचप्रमाणे आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या आजूबाजूच्या मंडळींना सेक्युरिटी गार्ड असा शब्दाचा वापर करण्यात आला. आता नेमके हे सिक्युरिटी गार्ड म्हणजे कोण? या संदर्भात उलट उलट चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पाच दशकांनंतर पक्ष सोडला आहे.

काँग्रेस सोडण्यापूर्वी आझाद यांनी लिहिलेल्या पत्रातील काही प्रश्नांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या पत्रात आझाद यांनी लिहिले होते की, देशातील सर्वात जुना पक्ष आता समग्र रुपात नष्ट झालेला आहे. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाने सगळ्यांना धोका देत आहे. त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश व्यवहार करीत असल्याचाही आरोप केला आहे.

सोनिया गांधी या केवळ नाममात्र नेत्या राहिल्या असल्याचे सांगत निर्णय राहुल गांधी करत असल्याचे म्हटले आहे. हे निर्णय राहुल गांधी यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक करत असल्याचा खळबळजनक आरोपही आझाद यांनी त्यांच्या पत्रात केला आहे. परंतु गुलाम नबी आझाद यांना गेल्या पन्नास वर्षात असे दिसले नाही का की आत्ताच त्यांना अचानकपणे साक्षात्कार झाला अशी देखील चर्चा सुरू आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या पत्रात ज्या सिक्युरिटी गार्डचा उल्लेख करण्यात आला आहे, तो नेमका आहे तरी कोण, त्याच्य़ावर आझाद यांनी का प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या वर्तुळातील नेत्यांवरही आझाद यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या आठ वर्षांत पक्षावर गंभीर नसलेल्या नेतृत्वाला थोपवण्याचा प्रयत्न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असे आझाद यांनी म्हटले आहे. चमच्यांच्या संरक्षणात काँग्रेसची वाटचाल सुरु असल्याचा आरोपही आझाद यांनी केला आहे. ही कोण मंडळी आहेत, हेही जाणून घेऊयात.

एका वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यात सिक्युरिटी गार्ड असा जो उल्लेख करण्यात आला आहे, तो म्हणजे के.बी. बायजू.  बायजू हे सुरुवातचीला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये होते. राहुल गांधी हे सरचिटणीस झाल्यानंतर बायजू त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले. बायजू यांच्याकडे पक्षाचे कोणतेही औपचारिक पद नसतानाही, त्यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. इतकेच नव्हे तर बायजू हे राहुल गांधी यांच्या सुरक्षेसह इतरही महत्त्वाची कामे पार पाडतात. यात यावर्षीचा गोवा दौराही आहे. बायजू हे भारत जोडो यात्रेचे महत्त्वाचे घटक आहेत. राहुल गांधी यांचे दौरे पाहत असल्याने बायजू हे पक्षात पॉवरफुल झाले असल्याचे सांगण्यात येते. राहुल यांच्यासोबत कोणी किती वेळ घालवायचा ह बायजूच ठरवत असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे राहुल यांच्यासोबत ते व्यासपीठावरही असतात. पंजाबमध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये कलह झाला होता, तेव्हा राहुल गांधी यांचे वैयक्तिक दूत म्हणून बायजू हेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडे गेले होते. यावरुन त्यांचे पक्षातील महत्त्व लक्षात येऊ शकेल. नंतर कॅप्टन काँग्रेसमधून बाहेर पडले. त्याचबरोबर आझाद यांनी पत्रात राहुल यांची मंडळी असा उल्लेख केला आहे, त्यात के.सी. वेणूगोपाल यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. वेणूगोपाल हे राहुल गांधी यांचे नीकटवर्तीय आहेत. २०१७ सारली त्यांना सरचिटणीस करण्यात आले होते, त्याच वर्षी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. वेणूगोपाल यांच्यापर्यंत पोहचणे त्यावेळी अवघड मानले जात असे. आझाद यांचे आरोप वेणूगोपाल यांनी फेटाळले आहेत. ज्याप्रमाणे आझाद हे राजीव आणि संजय गांधी यांचे नीकटवर्तीय होते.

त्याचप्रमाणे राहुल यांच्या टीममध्ये आपण असल्याचे वेणूगोपाल यांनी सांगितलेले आहे. राहुल यांच्या टीममध्ये रणदीपसिंह सुरजेवाला आणि अजय माकन हेही आहेत. परंतु गुलाम-नव्याचा यांचा आरोप नेमका कोणावर आहे या संदर्भात स्पष्टपणे म्हटलेले नाही त्यामुळे याची उलट सुलट चर्चा सुरू आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद हे काँग्रेस पासून दूर जात होते आणि भाजपची जवळीक साधत होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Who is Security Guard of Rahul Gandhi Politics Congress
Gulam Nabi Azad Letter

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२००१ विनाशकारी भूकंप… अनेक गावे उद्धवस्त… २०२२ संपूर्ण परिसर चकाचक (बघा मोदींनी शेअर केलेला हा व्हिडिओ)

Next Post

‘आप’ला देशात अच्छे दिन! बघा, नागरिकांचा कुणाकडे आहे कल? (सर्वेक्षणाचा निष्कर्ष)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Modi Kejriwal

'आप'ला देशात अच्छे दिन! बघा, नागरिकांचा कुणाकडे आहे कल? (सर्वेक्षणाचा निष्कर्ष)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011