इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, बुद्धीही चिरंतर आहे. तर सौंदर्य क्षणभंगूर आहे, कारण मानवाची बुद्धी ही बालपणापासून तर वृद्धापकाळातपर्यंत कार्य करते, असे म्हटले जाते. तर याउलट सौंदर्य हे फक्त तरुण काळातच असते. एकदा वयोमान हळूहळू वाढू लागले की, सौंदर्याची आभा देखील कमी होत जाते, हे अनेकांच्या बाबतीत खरे आहे ! मग एखादा अभिनेता असो की अभिनेत्री. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे मीनाक्षीचा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या या नव्या लूकवर चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. त्याच वेळी, काही जणांना त्यांना नीट ओळखताही येत नाही.
साधारणतः 80 आणि 90 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीची जादू इतकी चालली होती की, अनेक निर्माते तिला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी आतुर व्हायचे. आता मीनाक्षी शेषाद्री भलेही लाइमलाइटच्या जगापासून दूर असेल पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चर्चेत असते. तिच्या नवीन लूकची झलक शेअर करताना मीनाक्षी शेषाद्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘नवीन रूप…’. समोर आलेल्या चित्रात मीनाक्षीने चष्मा घातला आहे आणि तिने आकाशी रंगाचा हुडी घातला आहे. हेअरस्टाईल बदलल्यानंतर मीनाक्षीचा एकूण लुक बदलला आहे. काही जणांना तिची ही नवीन शैली आवडली आहे, तर काही जणांचे म्हणणे आहे की, तिने हा प्रयोग स्वतःवर केला नसावा. एका यूजरने लिहिले आहे की, ‘दामिनीमध्ये कोर्टरूममध्ये सौंदर्याची मर्यादा ओलांडली होती. ते रूप आश्चर्यकारक होते. माफ करा, पण तू लांब केसांमध्ये खूप सुंदर दिसत होतीस.’ दुसर्या युजरने लिहिले, ‘काय बदल आहे. तू आमच्या हृदयाची राणी आहेस.तुझे आरोग्य चांगले राहो आणि तू आमची आवडती अभिनेत्री आहेस.’ तसेच केवढा बदल झाला, पण तरीही तू आमच्या हृदयाची राणी आहेस.. तरीही तूच राज्य करतेस.. देव तुला आनंदी निरोगी आणि शांत आयुष्य देवो.
https://twitter.com/MinaxhiSeshadri/status/1495115064776572929?s=20&t=-uvDcKTTRbWQZsSdVgMGxA
दुसऱ्या युजर्सने लिहले की ,माझी आवडती स्टार असून तू बॉलीवूडमध्ये परत यावे आणि काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासारख्या महान प्रतिभावंतांची देशाला उणीव भासत आहे… साक्षीला चंद्र आहे, खरेच तुझ्यासारखा जगात कोणी नाही, ज्या रूपात तू तुझ्या चाहत्यांसमोर येशील, तेच रूप खूप गोंडस असेल. मीनाक्षी शेषाद्रीने लग्नानंतरच चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच तिने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केल्यानंतर ती अमेरिकेत शिफ्ट झाली. तिथेच मीनाक्षी शेषाद्रीने स्वतःची नृत्य स्कूल उघडली. तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट केले आहेत. हिरो, दिलवाला, स्वाती, दामिनी, घर हो तो ऐसा आणि शहेनशाह अशी काही चित्रपटांची नावे या यादीत आहेत.