इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिशा शर्मा या अवघ्या २० वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली, आणि अवघे मनोरंजव विश्व हलले. तिने आत्महत्या कशी केली यावर तर्कवितर्क सुरू झाले. आणि मग समोर आले ते तिचे ब्रेकअप. तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या शिझान खान याच्याविरोधात तुनिषाच्या आईने म्हणजेच वनिता शर्मा यांनी तक्रार दिली आहे. शिझान सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या आईचा आक्रोश बघवत नव्हता.
शिझानने आपल्या मुलीची फसवणूक केली. तिच्यासोबत नात्यात असताना तो दुसऱ्या मुलींसोबत त्याचे नातेसंबंध होते. आणि त्याने आपल्या मुलीचा निव्वळ वापर केला, असा तुनिषाच्या आईचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणात शिझानची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, शिझानने तुनिषाच्या आईचे आरोप फेटाळले आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर आपण तुनिषापासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला, असे शिझानचे म्हणणे आहे. तसेच आमचा धर्म वेगळा आणि वयातील अंतर यामुळे आपण तुनिषापासून दूर झाल्याचं शिझानचं म्हणणं आहे.
आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. शिझानची एक सिक्रेट गर्लफ्रेंड असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पोलिसांनी शिझानच्या कथित गर्लफ्रेंडचा शोध सुरू केला आहे. या सिक्रेट गर्लफ्रेंडचा उल्लेख तुनिषाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तुनिषाच्या आत्महत्येत शिझानच्या या कथित गर्लफ्रेंडची भूमिका आहे का, असेल तर ती काय, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच तुनिषाचं त्या मुलीशी कधी बोलणं झालं होतं का, याचाही शोध पोलीस शोध घेत आहेत. यासोबतच या सिक्रेट गर्लफ्रेंडबाबत तुनिषाला माहिती कोणी दिली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिझानने दुसऱ्या मुलीसाठी तुनिषाशी ब्रेक-अप केलं होतं, असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. पण अजूनपर्यंत या प्रकरणात इतर कोणत्याही मुलीचं नाव पुढे आलेलं नाही. यासाठी शिझानच्या गुप्त मैत्रिणीशी संपर्क साधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तुनिषाच्या आईने आरोपी शिझानला कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती केली आहे. शिझानने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. ब्रेकअपबाबत त्याने पोलिसांकडे धक्कादायक वक्तव्य केले आहे. शिझान सांगतो की, श्रद्धा खून प्रकरणानंतर अभिनेत्री तणावाखाली होती. दोघांचा धर्म वेगळा होता आणि वयातही फरक होता. मात्र, शिझानच्या वक्तव्यावर पोलिसांचा विश्वास बसलेला नाही.
Who is Secrete Girl Friend of Actor Sheezan Khan
Tunisha Sharma Death Case Suicide Entertainment TV