मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राधिका मर्चंट हे नाव सध्या बरंच चर्चेत आहे. राधिकाचा अरंगेत्रम हा नृत्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे. पण एवढेच चर्चेचे कारण नसून राधिका लवकरच अंबानींची सून होणार आहे.
जिओ वर्लड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये राधिकाचा अरंगेत्रम हा भरतनाट्यमनिगडित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ती भरतनाट्यमधली लोकप्रिय नृत्यांगणा आहे. गेल्या आठ वर्षांपासून राधिका गुरु सुश्री भावना ठाकर यांच्याकडून नृत्याचे धडे घेत असून अरंगेत्रममध्ये तिने आपल्या कलेचे सादरीकरण केले. नीता अंबानी यांनीदेखील भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे सासू आणि सुन दोघीही या कलेत पारंगत असल्याचे दिसून येत आहे. राधिकाने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केला आहे.
या सोहळ्याला सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजर लावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला सहकुटूंब उपस्थित होते. कार्यक्रमाला येताना सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. महिलांनी भरजरी साड्या, भरतकाम केलेल्या उंची दर्जाच्या साड्या तर पुरुषांनी शेरवानी आणि कुर्ते परिधान केले होते. यादरम्यान अंबानी आणि कुटुंबातील सदस्यांनी प्रत्येक पाहुण्याचे यथोचित स्वागत केले. या दरम्यान, सर्व कोविड प्रोटोकॉल देखील काटेकोरपणे पाळले गेले. कार्यक्रमात सामील होण्यापूर्वी सर्व पाहुण्यांची कोविड चाचणी करण्यात आली. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसोबत राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.